⁠ 
रविवार, ऑक्टोबर 27, 2024
Home | वाणिज्य | सरकारकडून करोडो महिलांना मोफत LPG सिलिंडरची भेट! जाणून घ्या कोणाला मिळणार लाभ?

सरकारकडून करोडो महिलांना मोफत LPG सिलिंडरची भेट! जाणून घ्या कोणाला मिळणार लाभ?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । दिवाळीपूर्वी मोफत सिलिंडर योजना सुरू झाली आहे. दिवाळीनिमित्त विविध राज्ये आपापल्या राज्यात मोफत गॅस सिलिंडर वाटप करण्याच्या तयारीत आहेत. नुकतीच उत्तर प्रदेश सरकारने मोफत गॅस सिलिंडर योजना जाहीर केली. त्यानंतर आंध्र प्रदेश सरकारनेही दिवाळीला मोफत गॅस सिलिंडर वाटप करण्याची घोषणा केली. तसेच काही दिवसापूर्वी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना एका वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत.

केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शन असणाऱ्यांना दिवाळीत मोफत सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले आहे. उत्तर प्रदेश सरकारने होळी आणि दिवाळीला लाभार्थ्यांना मोफत सिलिंडर देण्याची घोषणा केली होती. महाराष्ट्रात देखील महिलांना मोफत एलपीजी सिलिंडरचा लाभ देण्यात येत आहे.

हा लाभ घेण्यासाठी, प्रथम कनेक्शनधारकाला गॅस सिलिंडरची संपूर्ण रक्कम रोखीने भरावी लागेल. परतावा म्हणून, तीन ते चार दिवसांनी ग्राहकांच्या बँक खात्यात रक्कम हस्तांतरित केली जाईल. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना सामान्य ग्राहकांपेक्षा 300 रुपयांनी स्वस्त सिलिंडर मिळतो. अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते.

मोफत गॅस सिलिंडर कोणाला मिळणार?
या योजनेचा लाभ अशा ग्राहकांनाच मिळणार आहे जे पंतप्रधान उज्ज्वला योजनेचे लाभार्थी आहेत. ज्यांच्या आधारे आधार प्रमाणीकरण करण्यात आले आहे. ज्या ग्राहकांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. तुम्ही अजून तुमचे eKYC केले नसेल, तर तुमच्या संबंधित गॅस एजन्सीशी संपर्क साधा आणि आधार पडताळणी करून घ्या.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.