⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | गुन्हे | लाच भोवली! पारोळ्याच्या गटविकास अधिकारीसह ५ कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

लाच भोवली! पारोळ्याच्या गटविकास अधिकारीसह ५ कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑक्टोबर २०२४ । पारोळा तालुक्यातील सावखेडे तुर्क ग्रामपंचायतीच्या विकासकामांचे बिल मिळावे तसेच इतर कामांची वर्क ऑर्डर काढावी म्हणून दोन किशोर शिंदे लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पारोळा गटविकास अधिकारी किशोर दत्ताजीराव शिंदे यांच्यासह पाच कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी बुधवारी (दि. २३) संशयिताना ताब्यात घेण्यात आले. तक्रारदार बांधकाम व्यावसायिकाने सावखेडे तुर्क ग्रामपंचायत परिसरात विकासकामांचा ठेका घेतला होता. त्याचे बिल मिळावे तसेच इतर कामांच्या वर्कऑर्डर मिळण्याकरिता संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडे दोन लाख रुपये लाचेची मागणी करण्यात आली. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात लाचेची मागणी केली होती.

याबाबत तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या विभागाने बुधवारी (दि. २३) पारोळा गटविकास अधिकारी किशोर दत्ताजीराव शिंदे (वय ५६), सुनील अमृत पाटील (वय ५८), गणेश प्रभाकर पाटील (वय ५०), अतुल पंढरीनाथ पाटील (वय ३७) आणि योगेश साहेबराव पाटील (वय ३७) यांना ताब्यात घेतले असून, पारोळा पोलिसांत याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.