⁠ 
बुधवार, ऑक्टोबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहरासह ग्रामीण मध्ये ‘मविआ’कडून उमेदवारी अनिश्चित, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

जळगाव शहरासह ग्रामीण मध्ये ‘मविआ’कडून उमेदवारी अनिश्चित, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

शरद पवार गटाकडून ५० जणांना ‘एबी फॉर्म’वाटप?

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२४ । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील भाजपानंतर आता शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. लवकरच अजित पवार गटाकडून देखील पहिली यादी जाहीर होणार आहे. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावर घोडं अडलं असून पण शरद पवार यांनी आपला डाव टाकण्यास सुरुवात केली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आतापर्यंत ५० जणांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे. दुसरीकडे जळगाव शहरासह ग्रामीण मध्ये ‘मविअ’कडून उमेदवारी अनिश्चित असलयाने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय.

दरम्यान, बारामतीमधून अजित पवार यांच्या विरुद्ध शरद पवार कोणाला उमेदवारी देणार? यांकडे लक्ष लागले होते. अखेर युगेंद्र पवार यांना शरद पवार यांनी बारामतीमधून उमेदवारी दिल्याचे समोर आलेय. त्यामुळे बारामतीत अजित पवार यांच्या विरोधात पुतण्या उभा राहणार हे निश्चीत आहे. युगेंद्र पवार यांना एबी फॉर्म देण्यात आल्यानंतर युगेंद्र पवार तयारीला लागले आहेत. युगेंद्र पवार यांनी निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून मालमत्तेवर थकबाकी नसल्याबाबतचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेतले आहे.

कुणाला देण्यात आले एबी फॉर्म –
जयंत पाटील
सुनील भुसारा
प्राजक्त तनपुरे
रोहित पवार
युगेंद्र पवार
राखी जाधव
अनिल देशमुख
जितेंद्र आव्हाड
राणी लंके
प्रशांत यादव
राहुल जगताप – श्रीगोंदा

जळगावमध्ये संभ्रम
दरम्यान जळगाव जिल्ह्यात महायुतीमधील भाजपानंतर शिवसेनेने उमेदवार जाहीर केले. मात्र अद्याप महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर झाले नाहीय. महायुतीने जळगाव शहरातून आमदार सुरेश भोळे यांना पुन्हा संधी दिली. तर जळगाव ग्रामीणमधून शिवसेनेकडून मंत्री गुलाबराव पाटील यांना उमेदवारी मिळाली. मात्र ‘मविअ’कडून जळगाव शहरासह जळगाव ग्रामीणमधून उमेदवार अनिश्चित असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.