जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑक्टोबर २०२४ । राज्यात मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबायच्या नावच घेत नाहीय. यातच मुलींना लग्नाचे आमिष देऊन त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना देखील सातत्याने समोर येत आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील एका २५ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत केलेल्या अत्याचारातून गर्भवती करत लग्नास नकार दिला. याप्रकरणी जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील दोन जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी काय आहे घटना?
जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात राहणाऱ्या तरुणाची ओळख ठाणे जिल्ह्यातील एका २५ वर्षीय तरुणीची झाली मार्च २०२२ ते १४ ऑक्टोबर २०२४च्या दरम्यान धनराज याने पीडित तरुणीला लग्नाची आमिष दाखविले, तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. या अत्याचारातून पीडित तरुणी ही गर्भवती राहिली. त्यानंतर तरुणीने लग्नासाठी मागणी केली असता तरुणाने आणि तरुणाच्या आईने पीडित तरुणीला गर्भपात सल्ला दिला दरम्यान तरुणीने गर्भपात करण्यास नकार दिल्याने, तिला शिवीगाळ करत लग्न न करण्याची धमकी दिली.
दरम्यान पिडीत तरुणीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धावघेवून तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी २१ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी आणि त्याची आई या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास स.पो.नि. माधुरी बोरसे करीत आहे.