⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | शरद पवार गटाच्या 39 उमेदवारांची यादी ठरली; जळगाव जिल्ह्यात या उमेदवारांना संधी?

शरद पवार गटाच्या 39 उमेदवारांची यादी ठरली; जळगाव जिल्ह्यात या उमेदवारांना संधी?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२४ । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर आता राज्यातील महायुतीसह महाविकास आघाडीमधील घटक पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. काल म्हणजेच रविवारी विधानसभेसाठी भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांची संभाव्य उमेदवारांची नावेही समोर आली आहेत.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे ३९ उमेदवार ठरल्याची बातमी ‘साम’ या मराठी वृत्तवाहिने दिली आहे. यामुळे अधिकृत उमेदवारी यादी कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. या ३९ उमेदवाराच्या यादीत जळगाव शहरातून गुलाबराव देवकर, तर रोहिणी खडसे मुक्ताईनगर, दिलीप खोडपे जामनेर मधून तर चाळीसगावमधून राजीव देशमुख यांच्या नावाचा समावेश आहे.

या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार
जयंतराव पाटील – इस्लामपूर विधानसभा
डॉ. जितेंद्र आव्हाड – कळवा मुंब्रा विधानसभा
अनिल देशमुख – काटोल
राजेश टोपे – घनसावंगी
बाळासाहेब पाटील – कराड ऊत्तर
रोहित पवार – कर्जत जामखेड
प्राजक्त तनपुरे – राहुरी

रोहित पाटील – तासगाव कवठे महांकाळ
सुनील भुसारा – विक्रमगड
अशोक पवार – शिरूर
मानसिंग नाईक – शिराळा
शशिकांत शिंदे – कोरेगाव
संदीप क्षीरसागर – बीड
हर्षवर्धन पाटील – इंदापूर
राखीताई जाधव – घाटकोपर पूर्व
राजेंद्र शिंगणे – सिंदखेड राजा
युगेंद्र पवार – बारामती
समरजीत घाटगे – कागल
राणी लंके – पारनेर
रोहिणीताई खडसे – मुक्ताईनगर
गुलाबराव देवकर आप्पा – जळगाव शहर
दिलीप खोडपे – जामनेर
राजीव देशमुख – चाळीसगाव

प्रभाकर देशमुख – माण खटाव
अमित भांगरे – अकोले
प्रतापराव ढाकणे – पाथर्डी
दिपीकाताई चव्हाण – बागलाण
प्रशांत जगताप – हडपसर
सचिन दोडके – खडकवासला
देवदत्त निकम – आंबेगाव
उत्तमराव जानकर – माळशिरस
नंदाताई कुपेकर- बाभूळकर – चंदगड
पृथ्वीराज साठे – केज विधानसभा
भाग्यश्री आत्राम – अहेरी

प्रदीप नाईक जाधव – किनवट
जयप्रकाश दांडेगावकर – वसमत
बाबजानी दुराणी – पाथरी
विजय भामळे – जिंतूर
चंद्रकांत दानवे – भोकरदन

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.