⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | गुन्हे | अंगावर वीज पडून बालकासह शेळीचा मृत्यू, पाचोऱ्यातील घटना

अंगावर वीज पडून बालकासह शेळीचा मृत्यू, पाचोऱ्यातील घटना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२४ । जळगाव जिल्ह्यात मागील दोन तीन दिवसापासून विजांच्या कडकडाटासह परतीचा पाऊस होत असून याच दरम्यान एक अत्यंत दुर्दैवी घटना घडलीय. पाचोरा तालुक्यात झालेल्या वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसात लोहारी गावाजवळ शेतात वीज पडून एका बालकासह व शेळीचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

पाचोरा तालुक्यातील लोहारी गावाजवळ असलेल्या अनिल पाटील यांच्या शेतामध्ये शिवराम सिताराम शिंगाडे, पत्नी मंगला शिवराम शिंगाडे व त्यांचा मुलगा गोरखनाथ (रा. पिंप्राळा ता. नांदगाव जि. नाशिक) हे धनगर समाजाचे कुटुंब मेंढरं घेऊन मुक्कामाला होते. दरम्यान १८ ऑक्टोम्बरला सायंकाळपासून सुरु असलेल्या वादळीवाऱ्यासह पावसाने रात्री अधिक जोर पकडला. वीजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. जोरदार पाऊस होत असल्याने मेंढ्यांच्या वाड्याजवळ बनवलेल्या कुपीमध्ये पती- पत्नी व मुलगा बचावासाठी बसले होते.

दरम्यान रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास जोरदार आवाज होऊन वीज थेट गोरखनाथ शिंगाडे यांच्या अंगावर पडली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तसेच त्याचा जवळच असलेल्या एका शेळीचा देखील मृत्यू झाला. विजेचा जोरदार आवाजाने घाबरलेले त्याचे आई- वडिलांनी त्याच्याकडे धाव घेतली. मुलाचा मृतदेह पाहून हंबरडा फोडला. लोहारी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. सकाळी मृत गोरखनाथ याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.