⁠ 
शनिवार, ऑक्टोबर 19, 2024
Home | जळगाव जिल्हा | महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हेल्थ रन २०२४ मध्ये गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचे यश

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हेल्थ रन २०२४ मध्ये गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचे यश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

३ कि.मी. स्पर्धेत प्रा अभिजित राठोड व्दीतीय, बीएस्सीचा भिसन बारेला पाचवा

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२४ । महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक आयोजित हेल्थ रन २०२४ मध्ये गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्रा. अभिजित राठोड आणि बी.एस्सी. (नर्सिंग) पाचव्या सत्राचे विद्यार्थी भिसन बारेला यांनी यश मिळवले आहे. या स्पर्धेचा उद्देश समाजात सुदृढ आरोग्यासाठी चालणे आणि धावण्याचे महत्त्व पटवून देण्याचा होता.या हेल्थ रनमध्ये गोदावरी नर्सिंगचे ३० विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते.

३ कि.मी. शर्यतीत प्रा. अभिजित राठोड यांनी द्वितीय क्रमांक पटकावत रु. ८०००/- रोख रक्कम, प्रमाणपत्र व पदक मिळवले. त्याचबरोबर, बी.एस्सी. नर्सिंग पाचव्या सत्रात शिकणारा विद्यार्थी भिसन बारेला याने पाचवा क्रमांक मिळवून रु. ५०००/- रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि पदक प्राप्त केले.या विजेत्यांचा सत्कार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट कर्नल माधुरी कानिटकर यांच्या हस्ते करण्यात आला.

या हेल्थ रनमध्ये महाराष्ट्रातील विविध आरोग्य विज्ञान महाविद्यालयांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. त्यांच्या या यशाबददल गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जल्‍लोष व्यक्‍त करण्यात येत असून विजेत्या स्पर्धकांचे संस्थेचे अध्यक्ष माजी खा.डॉ. उल्हास पाटील,उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकीताई पाटील,डी एम कॉर्डीओलॉजी डॉ.वैभव पाटील, प्राचार्य विशाखा गणविर यांनी अभिनंदन केले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.