⁠ 
[rank_math_breadcrumb]

दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेला चोरटा जाळ्यात; चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२४ । दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात ५ वर्षांपासून फरार असलेल्या संशयित आरोपीला जळगाव एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. जिवन गोकुळ शिंदे (रा. कठोरा ता.जळगाव) असं अटक केलेल्या आरोपीचे नाव असून पुढील कारवाईसाठी त्याला जळगाव तालुका पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

एमआयडीसी पोलीसानी पाच वर्षांपासून चोरीस गेलेल्या मोटरसायकलचे दोन गुन्हे उघडकीस आणले आले आहे. सन 2018 साली प्रशांत सानप रा. शनीपेठ जळगाव यांची सीडी डीलक्स मोटर सायकल क्रमांक एमएच 19 बीई 6230 ही आव्हाणे शिवारातुन चोरी गेली होती. या बाबतीत जळगाव तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गोपणीय बातमी मिळाली होती कि, कठोरा येथील राहणारा जिवन गोकुळ शिंदे याच्याकडे चोरीच्या दोन मोटार सायकली आहेत.

या बातमीवरुन कठोरा येथुन जिवन शिंदे यास ताब्यात घेवुन त्याचेकडे असलेल्या दोन्ही मोटार सायकलींबाबत विचारपुस करता तो उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याने दोन्ही मोटार सायकलींची माहीती काढली असता सीडी डीलक्स मोटर सायकल क्रमांक एमएच 19 बीई 6230 ही प्रशांत सानप रा. शनीपेठ जळगाव यांच्या मालकिची दिसून आली आणि अजुन एक सीडी डीलक्स मोटर सायकल क्रमांक एमएच 12 जीएच 0897 ही मोटर सायकल ही सुरेश वासुदेव इंगळे रा दशरथनगर विश्रांतवाडी पुणे यांच्या नावावर असल्याची माहीती मिळून आलेली आहे.

सदर मोटार सायकलींबाबत जळगाव तालुका पोलिस स्टेशनला एक गुन्हा व एक पुणे येथे दाखल आहे. आरोपी जिवन गोकुळ शिंदे यास जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात मोटार सायकल सह देण्यात आले आहे. सदर कारवाई ही पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांचे मार्गदर्शनाखाली पोउनी दिपक जगदाळे, पोहेका, गणेश शिरसाळे, जमीर शेख, किशोर पाटील, पोका नाना तायडे, गणेश ठाकरे, नितीन ठाकरे, किरण पाटील विकास सातदीवे, योगेश बारी यांनी केलेली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.