⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | गुन्हे | चार आयशरमधून म्हशींची अवैध वाहतूक; ३३ म्हशींसह ६४ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त

चार आयशरमधून म्हशींची अवैध वाहतूक; ३३ म्हशींसह ६४ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२४ । रावेर पोलिस स्टेशन हद्दीतील महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सिमेवरील पाल दूर क्षेत्र येथील शेरीनाक्यावर चार आयशरमधून म्हशींची अवैध वाहतूक होत असल्याचे उघड झाले. या कारवाईत देशी व मुऱ्हा जातीच्या एकूण ३३ म्हशींसह वाहन ताब्यात घेण्यात आले. ६४ लाख ५० हजार रुपयांचा हा मुद्देमाल आहे

नाका येथे पोलिस उपनिरीक्षक तुषार पाटील, हवालदार ईश्वर चव्हाण, जगदीश पाटील हे पथक वाहनांची तपासणी करत होते. त्यात १६ रोजी पहाटे १.३० वाजेचे सुमारास आयशर चालकास थांबवून वाहनात काय आहे? अशी विचारणा केली त्यांनी वाहनात म्हशी असल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी तपासणी केल्यावर प्रत्येक वाहनात दाटीवाटीने आणि अतिशय निर्दयपणे म्हशींना बांधल्याचे समोर आले. पथकाने ही माहिती पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल कळवली.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणुन वरिष्ठांच्या सूचनेनुसार वरील चारही वाहने व चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील म्हशींची सुटका करून त्या रावेर गावातील सावदा रोड लगत असलेल्या द्वारकाधीश गोशाळेसमोर आणून चारा, पाण्याची व्यवस्था केली. चौकशीत वाहन चालकांकडे म्हशी खरेदीची कागदपत्रे, डॉक्टरांचे प्रमाणपत्र, वाहतूक परवाना नसल्याचे समोर आले.

याप्रकरणी इरफान खान हिरु खान मेवाती (वय ३९, रा. सारपाटा ता. . अमळनेरि अमळनेर जि. जळगाव), इनायत खान काल्या खान (वय ४० रा. बनखड ता. कसरावद जि. खरगोन), राजू खान र न सलीम र खान (वय ४०, रा. ताजपूर ता. जि. उज्जैन), अली खान शरीफ खान (वय ३६, रा. पालसमद ता. कसरावद जि. खरगोन) या चारही चालकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच रावेर पोलिसांनी अनुक्रमे एमएच.१८-बीझेड ७४५५, एमएच.१८-बीजी ८९३६३, एमएच.१८-बीजी ३८२३ आणि एमपी-०९-डीजी ६६४४ या क्रमांकाच्या ट्रक जप्त केल्या.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.