जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२४ । सोने चांदी खरेदी प्लॅन करणाऱ्या ग्राहकांना झटका देणारी बातमी आहे. एकीकडे दिवाळीचा सण तोंडावर आलेला असताना त्यातच सोन्याने नवा विक्रमी उच्चांक गाठला. जळगाव सुवर्णपेठेत सोने विनाजीएसटी ७७ हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे. यामुळे आता सोने खरेदी करताना ग्राहकांचं दिवाळंच निघणार आहे.
बुधवारी सोने ७०० रुपयांनी तर चांदी प्रति किलो एक हजार रुपयांना वाधरली आहे. यामुळे आज गुरुवारी सकाळच्या सत्रात २२ कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा ७०,५८६ रुपये प्रति तोळा एवढे आहेत तर २४ कॅरट सोन्याचे दर ७७,००० रुपये प्रति तोळा एवढा आहे. जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याचा दर ७९,३०० रुपयावर पोहोचला आहे. दुसरीकडे चांदीचा दर ९३००० रुपये प्रति किलोवर आहे. जीएसटीसह चांदीचा दर ९५,७९० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
दरम्यान सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. सध्या आगामी सोन्याचे भाव वाढतच असून, डिसेंबरपर्यंत सोन्याचे दर ८५ हजार रुपये प्रति तोळ्यापर्यंत पोहोचू शकतो असा अंदाज सराफा व्यवसायिकांनी व्यक्त केला आहे.
जळगावात सोन्याचा दर विनाजीएसटी पहिल्याच ७७ हजार रुपयांवर पोहोचला आहे. हा वाढता दर सोने बाजारासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. सोन्याच्या किंमतीत होणाऱ्या या वृद्धीचा परिणाम बाजारातील अस्थिरता आणि जागतिक आर्थिक घडामोडींवर दिसून येत आहे.