⁠ 
मंगळवार, नोव्हेंबर 26, 2024
Home | बातम्या | खुशखबर! ‘लाडक्या बहिणीं’ना मिळणार ५५०० रुपयांचा दिवाळी बोनस; तुम्ही आहात का पात्र?

खुशखबर! ‘लाडक्या बहिणीं’ना मिळणार ५५०० रुपयांचा दिवाळी बोनस; तुम्ही आहात का पात्र?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२४ । राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली असून या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहे. या योजनेचे आतापर्यंत पात्र महिलांच्या खात्यात ७५०० हजार रुपये जमा करण्यात आले आहे. यानंतर आता दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खास गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे.

सरकारने म्हटलंय की, दिवाळीच्या सणानिमित्त योजनेच्या सर्व पात्र महिलांना 3000 रुपयांचं बोनस दिलं जाईल. ही रक्कम महिन्याला नियमित मिळणारे पैसे वगळून दिली जाईल. काही निवडक महिलांना 2500 रुपयांची अतिरिक्त रक्कमही दिली जाईल. याप्रकारे काही महिलांना एकूण 5500 (3000+2500) रुपयांचा लाभ मिळणार आहे. दिवाळीचा बोनस फक्त लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांनाच मिळणार आहे. यामुळे महिलांची यंदाची दिवाळी अधिक चांगली होणार आहे. यासाठी या अटी पूर्ण कराव्या लागतील.

लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने सुरु केलेली एक महत्त्वाकांशी योजना आहे. राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं, हाच या योजनेचा उद्देश आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जातं. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाते.या योजनेत आतापर्यंत महिलांना ५ महिन्याचे ७५०० रुपये जमा झाले आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे ३००० रुपये एकत्रितपणे देण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्याचे १५०० रुपये देण्यात आले होते. त्यानंतर आता महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे ३००० रुपये एकत्रितपणे देण्यात आले आहेत. त्यानंतर आता महिलांना दिवाळी गिफ्ट म्हणून बोनस देणार असल्याचं जाहीर केलं आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ज्या महिलांनी अर्ज केले नाहीत त्या महिलांनी आज अर्ज करावेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.