⁠ 
मंगळवार, ऑक्टोबर 22, 2024
Home | बातम्या | विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे ‘मुस्लिम कार्ड’!

विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे ‘मुस्लिम कार्ड’!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल कधीही वाजू शकते. निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीने कंबर कसली असून आपआपल्या परिने धोरणे आखण्यास सुरुवात केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला झालेल्या मतदानात मुस्लिम मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. विधानसभा निवडणुकीतही मुस्लिम मतदारांची एकगठ्ठा मते मिळविण्यासाठी महाविकास आघाडीने मुस्लिम कार्ड खेळले आहे.

लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने एक गठ्ठा मतदान केल्याने भाजपाने धुळे, ईशान्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई या जागा गमविल्या. आता याच एकगठ्ठा मतांसाठी महाविकास आघाडीने भविष्यात मुस्लिम उपमुख्यमंत्री करण्याची खेळी केल्याचे म्हटले जात आहे.

मुस्लिम मतदार भाजपला मतदान करीत नाही, असं म्हटलं जातं. लोकसभा निवडणुकीत ते स्पष्टपणे दिसूनही आले आहे. नुकत्याच झालेल्या हरियाणा आणि जम्मू कश्मीर विधानसभा निवडणुकीत सुद्धा हा पॅटर्न कायम राहिला. जम्मू आणि काश्मीर या भागात काँग्रेसचा एकही आमदार हिंदू किंवा बौद्ध धर्मीय नाही. निवडून आलेले सहापैकी सहा आमदार हे मुस्लिम समाजाचे आहेत. हरियाणामध्येही मुस्लिम मतदारांच्या एकगठ्ठा मतदानामुळेच काँग्रेस 36 जागा गाठू शकली. यामुळे महाराष्ट्रातही महाविकास आघाडी हेच कार्ड खेळण्याच्या तयारीत आहे.

हरियाणामध्ये काँग्रेसने हिंदू मतांमध्ये जातीच्या आधारावर विभागणी करुन जाट, दलित आणि मुस्लिम अशी मोट बांधण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता. मात्र भाजपने तो हाणून पाडला. जाट आणि दलित बहुल भागात देखील भाजपला चांगले मतदान झाले. केवळ मुस्लिम मतदानामुळे काँग्रेसचे आव्हान शाबूत राहिले. जम्मूमध्ये हिंदू बहुल भागाने भाजपला साथ दिली. काश्मीर खोऱ्यात मात्र मुस्लिम बहुल भाग हा काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स सोबतच राहिला. यामुळे महाराष्ट्रातील मुस्लिम बहुल भागातील जागांवर एकहाती विजय मिळविण्यासाठी महाविकास आघाडीने त्या दृष्टीने रणणीती आखण्यास सुरुवात केली आहे.

महाविकास आघाडीची ही निवडणुकीची रणणीती काँग्रेस व शरद पवार गटासाठी पुरक ठरत असली तरी उध्दव ठाकरे यांच्या गटाची कोंडी करणारी आहे. आतापर्यंत उध्दव ठाकरे यांचे राजकारण हिंदूंच्या अवतीभवती फिरणारे होते मात्र आता त्यांनी काँग्रेसचा हात धरल्यापासून उद्धव ठाकरे यांचा हिंदू मतदार एकनाथ शिंदेंकडे वळलेला आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनाही मुस्लिम मतांवरच अवलंबून राहावे लागत असल्याची टीका उद्धव ठाकरे गटावर केली जात आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीत 40 जागा मुस्लिम समाजाला द्यायला हव्यात, अशी मागणी मुस्लिम नेत्यांनी केली आहे.

मुंबई व उपनगरांच्या राजकारणाबद्दल बोलयचे म्हटल्यास, मानखुर्द, शिवाजीनगर, गोवंडी, वांद्रे पूर्व, मुंबादेवी, भायखळा या मुस्लिम बहुलपट्ट्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला अधिक मतदान झाले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीलाही भिवंडीत तोच अनुभव आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनाही भविष्यात मुस्लिम मतांवरच विसंबून राहावे लागणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. उद्धव ठाकरे यांनी वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध केल्यानंतर त्यांची भुमिका जवळपास स्पष्ट झाली होती. एम आय एम किंवा वंचित बहुजन आघाडीकडे मुस्लिम मतदार जावू नये यासाठीही महाविकास आघाडीकडून विशेष काळजी घेतली जात आहे.

अयोध्येत राम मंदीर उभारणीपासून काँग्रेस नेत्यांनी नेहमीच विरोधी भुमिका घेतली आहे. त्याची किंमत यांना लोकसभा निवडणुकीच चुकवावी लागली आहे. आताही काँग्रेसच्या धोरणात फारसे बदल झालेले नाहीत. हिंदू देव देवतांचा जाहीर व्यासपीठावर अवमान, वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध, रामगिरी महाराज यांच्या अटकेची मागणी, आमदार नितेश राणे यांच्या अटकेची मागणी आदी बाबी महाविकास आघाडीच्या अंगलट येण्याचे संकेत महाविकास आघाडीच्या अंतर्गत सर्व्हेतून मिळाल्याने उपमुख्यमंत्री पद मुस्लिम समाजाला देण्याची महाविकास आघाडीच्या रणनीती निश्चित असल्याचे बोलले जात आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.