⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | गुन्हे | पुणे सीबीआयची जळगावात मोठी कारवाई! 25 हजारांची लाच घेतला अधिकारी जाळ्यात

पुणे सीबीआयची जळगावात मोठी कारवाई! 25 हजारांची लाच घेतला अधिकारी जाळ्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२४ । लाचखोरीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून अशातच पुणे सीबीआयने जळगावात येऊन मोठी कारवाई केली. जळगावातील भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील मुख्य वित्त व लेखाधिकाऱ्याला 25 हजारांची लाच घेताना पुणे सीबीआयने रंगेहात अटक केलीय. रमण वामन पवार (58, शनिपेठ, जळगाव) असे लाच घेणाऱ्या मुख्य वित्त व लेखाधिकाऱ्याचे नाव असून या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत असे की, तक्रारदाराच्या वडिलांच्या नावाने कामगार पुरवठा करणारी फर्म आहे. ती दोन वर्षांपासून बंद स्थितीत आहे. या फर्मचे लेखापरीक्षण करण्यासंदर्भात पीएफ कार्यालयाकडून माळी यांना नोटीस बजावण्यात आली. लेखा परीक्षण करण्यात आले मात्र अहवाल देण्यात आला नाही. विचारणा केल्यानंतर पवारांनी त्यात त्रृटींवर बोट दाखवले. फर्मच्या पीएफ थकबाकीच्या सेटलमेंटसाठी 50 हजारांची लाच मागून 25 हजारांवर तडजोड ठरली.

याबाबत तक्रारदार यांनी पुण्यात सीबीआयकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला.त्यानंतर जळगाव येथे रमण पवार यांना तक्रारदार यांच्याकडून २५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. दरम्यान या कारवाईबाबत गोपनीयता बाळगण्यात आली होती.

दरम्यान, पवार यांना बुधवारी न्यायालयाने 19 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पवार हे नाशिक येथील अंबड, लिंकरोड येथे वास्तव्यास आहेत तर जळगाव येथील शनिपेठ भागात ते भाडेतत्त्वावर राहतात.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.