⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

डॉ. केतकीताई पाटील यांच्याद्वारे शिबिरार्थींची आस्थेवाईकपणे विचारपूस

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑक्टोबर २०२४ । राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत उपमुख्यमंत्री (गृह/विधी व न्याय) यांचे कार्यालय व गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहरात दोन दिवस मोफत सामुदायिक आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात तज्ञ् डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी करण्यात आली असून आवश्यकतेनुसार गोळ्या-औषधी हि देण्यात आली. या शिबिरांना स्वतः भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी ताई पाटील यांनी भेटी देऊन शिबिरार्थींची आस्थेवाईकपणे विचारपूस करून त्यांच्या शंकाचे निरसन केले.

शनिवार दिनांक ५ व रविवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी अनुक्रमे जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी येथे व खडके चाळ बहुउद्देशीय संस्था संचलित “श्री गुरुदत्त उत्सव समिती मित्र मंडळ” शिवाजी नगर येथे मोफत सामुदायिक आरोग्य शिबिर घेण्यात आले. शिबिरात रक्तदाब, मधुमेह तसेच रक्ताच्या विविध तपासण्या करण्यात आल्यात. याशिवाय नागरिकांना असलेल्या विविध शारीरिक व्याधी जाणून घेत तज्ञ् डॉक्टरांनी शंकांचे निरसन केले. या प्रसंगी खुद्द गोदावरी फाऊंडेशन संचालिका तथा भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष यांनी भेटी देऊन शिबिरांची माहिती घेतली. या प्रसंगी उपस्थित शिबिरार्थींचीही त्यांनी विचारपूस केली तसेच आयोजकांशी संवाद साधला. या शिबिराचा फायदा होत असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

रामेश्वर कॉलनीतील शिबिरात शेकडो नागरिकांची आरोग्य तपासणी
प्रभाग क्र. १४ मधील रामेश्वर कॉलनी येथे ५ ऑक्टोबर रोजी मोफत सामुदायिक आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिरास आशुतोष पाटील, भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकीताई पाटील, भारतीय जनता युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष राहुल कुलकर्णी आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट दिली. शिबिरात डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि धर्मदाय रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ.अपूर्वा गवई , मेडिसिन विभागाचे डॉ. रिषभ पाटील,डॉ.प्रतीक शहा यांच्यासह परिचारिकांनी सेवा दिली.

“श्री गुरुदत्त उत्सव समिती मित्र मंडळ “
जळगाव शहरात रविवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी खडके चाळ बहुउद्देशीय संस्था संचलित ” श्री गुरुदत्त उत्सव समिती मित्र मंडळ ” शिवाजी नगर येथे सकाळी ९ ते दुपारी २ वाजे दरम्यान मोफत सामुदायिक आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात विनामूल्य तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले तसेच मोफत रक्त तपासणी करण्यात आली. शिबिरास भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकीताई पाटील, हृदयविकार तज्ञ् डॉ.वैभव पाटील, महेश चौधरी यांच्यासह मान्यवरांनी सदिच्छा भेटी दिल्या. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष पवन झुंजारराव , योगेश आवटे, ललित नन्नवरे, मनोज तीळवणे, अतुल शिरसाळे, आकाश जाधव आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. शिबिरात गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि धर्मदाय रुग्णालयाचे डॉ. हर्ष पटेल, डॉ.अपूर्वा गवई , डॉ.अरिभा आझमी, डॉ.प्रतिभा चिंचुरकर यांनी रुग्णांची तपासणी केली. यावेळी परिचारिका यांनीही सेवा दिली. महा लॅब चे दीपक महाजन रक्त तपासणी केली. या शिबिराचा शेकडो रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.