जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑक्टोबर २०२४ । सध्या सोने आणि चांदीचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. सोन्याचा भाव प्रति तोळा 77 हजार रुपयांवर गेला आहे तर चांदीचा दर 95 हजार रुपयांवर पोहोचला आहे. यामुळे धनत्रयोदशी आणि दिवाळीला सोन्याचे दागिने खरेदी करू इच्छिणाऱ्यांचा खिसा यावेळी चांगलाच रिकामा होऊ शकतो.
येत्या काही दिवसात सोन्याची उच्चांकी चढाई सुरूच राहणार आहे.ग्राहक आता खरेदी करावी की नाही? असा विचार करताना दिसत आहे. मात्र चांदी 1 लाखांचा तर सोने 80 हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. जर सोन्याचा भाव 80 हजारावर गेला तर ग्राहकांना मोठा धक्का बसेल
मागील आठवड्यात सोने 1500 रुपयाने वधारले होते. तर या आठवड्यात सोने 760 रुपयांनी महागले. म्हणजे दोन आठवड्यात सोन्याने जवळपास 2300 रुपयांची दरवाढ नोंदवली. सुरुवातीला 30 सप्टेंबरला 160 तर 1 ऑक्टोबरला 330 रुपयांनी सोने स्वस्त झाले. 2 ऑक्टोबरला 540 रुपयांनी ते महागले. त्यानंतर सलग दोन दिवस सोने 110 रुपयांनी वाढले. एकूण 760 रुपयांची वृद्धी नोंदवली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,350 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,820 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
29 सप्टेंबरपासून चांदीचा भाव गुडरिटर्न्सवर अपडेट झालेला नाही. चांदीची कोणतीही खबरबात या संकेतस्थळावर उपलब्ध नाही. 28 सप्टेंबर रोजी शेवटचे 1 हजार रुपयांनी स्वस्ताईची नोंद आहे. त्यानंतर सलग सात दिवसांत भावात कोणताही बदल झालेला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 95,000 रुपये आहे.