⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | धरणगाव | धरणगाव येथे महात्मा ज्योतिराव फुले प्रवेशद्वाराचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

धरणगाव येथे महात्मा ज्योतिराव फुले प्रवेशद्वाराचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑक्टोबर २०२४ । नगरपालिकेने उभारलेले महात्मा फुले यांचे भव्य प्रवेशद्वार हे क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या विचार जनतेला कायम स्फूर्ती देत राहील. महात्मा ज्योतिराव फुले हे सामाजिक परिवर्तनाचे आद्य क्रांतिकारक होते. या प्रवेशद्वाराच्यानिमित्ताने त्यांच्या कार्याची आठवण कायम स्मरणात राहील. हे प्रवेशद्वार केवळ वास्तू नसून ते महात्मा फुलेंच्या विचारांचे व कार्यांचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.ते धरणगाव येथे “महात्मा ज्योतिराव फुले प्रवेशद्वाराच्या” लोकार्पण प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा महाजन हे होते.

प्रथम धरणगाव येथील नगरपालिकेने उभारलेल्या भव्य प्रवेशद्वाराचे फटाक्यांच्या आतषबाजीत, महात्मा फुले यांच्या जय घोषात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते फीत कापून लोकार्पण करण्यात आले. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मंजूर केलेल्या वैशिट्य पूर्ण योजनेंतर्गत ३३ लाखांचा निधी खर्च करून हे प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा महाजन यांनी केले. सूत्रसंचालन व्ही.टी. माळी सर यांनी केले तर आभार उपाध्यक्ष विलास महाजन यांनी मानले.

यांची होती प्रमुख उपस्थिती
क्रांतीसूर्य महात्मा फुले प्रवेशद्वाराच्या लोकार्पणप्रसंगी माळी समाज अध्यक्ष विठोबा माळी, रामकृष्ण महाजन, शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर, सचिव गोपाळ महाजन, निम्बाजी महाजन, जेष्ठ पत्रकार कडू महाजन, शिवाजी देशमुख, शहर प्रमुख तथा उपाध्यक्ष विलास महाजन, राजेंद्र महाजन, दीपक महाजन, गटनेते कैलास माळी, पप्पू भावे, चर्मकार संघटनेचे भानुदास विसावे, उपजिल्हा प्रमुख पी. एम पाटील सर, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, दशरथ महाजन, रवी महाजन, भैया महाजन, डी. आर. पाटील सर, सुनील चौधरी, विनायक महाजन, एस.डब्ल्यू सर , नाना महाजन, बुट्ट्या पाटील, ऍडव्होकेट वसंतराव भोलाणे, रवी कंखरे यांच्यासह, नगरसेवक , माळी समाज बांधव सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.