⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | राष्ट्रीय | शेतकऱ्यांच्या खात्यात किसान सम्मान निधीचा १८ वा हप्ता जमा; तुम्हाला मिळाला का? असे चेक करा

शेतकऱ्यांच्या खात्यात किसान सम्मान निधीचा १८ वा हप्ता जमा; तुम्हाला मिळाला का? असे चेक करा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२४ । केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सम्मान निधी योजना राबविली जात असून यामध्ये शेतकऱ्यांना ३ समान हप्त्यांमध्ये ६,००० रुपये खात्यात ट्रांसफर केले जातात. हे पैसे (DBT) मार्फत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. या योजनेचे एकूण १७ हप्ते आतापर्यंत देण्यात आले आहेत.

अशातच आज शेतकऱ्यांच्या खात्यात किसान सम्मान निधीचा १८ वा हप्ता जमा करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी तब्बल ९.४ कोटी शेतकऱ्यांना २० हजार कोटी रुपये ट्रांसफर केलेत.

सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये ट्रांसफर झाले आहेत. पीएम किसान सम्मान निधी अंतर्गत आजवर शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून एकूण ३.४५ लाख कोटी रुपये पाठवण्यात आले आहेत. या कार्यक्रमावेळी राज्यपाल सीपी राधाकृष्णन आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान उपस्थित होते. तसेच केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. त्यासह २.५ कोटी शेतकरी या कार्यक्रमात वेबकास्टद्वारे सहभागी झाले होते.

अशी तपासा लाभार्थी यादी
सर्वात आधी pmkisan.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
त्यानंतर तुम्हाला काही पर्याय दिसतील त्यातील Benificiary List यावर क्लिक करा.
पुढे राज्य, जिल्हा, उप जिल्हा, तालुका, गाव याबाबत सर्व माहिती पूर्ण करा.
पुढे Get Report या पर्यायावर सुद्धा क्लिक करा.
यावर पुढे तुम्हाला स्क्रिनवर लाभार्थ्यांची यादी दिसेल.
योजनेबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी १५५२६१ किंवा २४३००६०६ या क्रमांकावर संपर्क साधा.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.