⁠ 
शनिवार, डिसेंबर 21, 2024
Home | बातम्या | राज्यस्तरीय पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयास व्दितीय पारितोषक

राज्यस्तरीय पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयास व्दितीय पारितोषक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२४ । महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई वर्षभरामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध स्पर्धा तसेच उपक्रम राबवत असते. त्यापैकीच महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांचे सौजन्याने राज्यस्तरीय पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेचे शासकीय तंत्रनिकेतन अहमदनगर यांचे तर्फे आयोजन करण्यात आले होते.

सदर स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन जळगावचे विद्यार्थी ग्रीष्मा जितेंद्र पाटील व पुष्पक सिद्धार्थ भालेराव या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या विद्यार्थ्यांनी स्मार्ट ग्रीड स्कोप इन इंडिया – ए रिव्ह्यू या विषयावर प्रेझेंटेशन दिले. या स्पर्धेमध्ये त्यांनी घवघवीत यश संपादन केले.या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक मिळवून १०,०००/- चे रोख बक्षीस जिंकले आहे.या स्पर्धेसाठी एकूण २७ संघांनी प्रेझेंटेशन करण्यासाठी प्रवेश नोंदविला होता.

याकरिता त्यांना मार्गदर्शक प्रा. एन. सी. पाटील, प्रा. चंद्रकांत शिंपी, पदविका विद्युत अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. चेतन विसपुते, पदविका समन्वयक प्रा. दीपक झांबरे तसेच इतर शिक्षक वृंदांचे मार्गदर्शन लाभले.त्यांच्या या यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील सदस्या डॉ. केतकीताई पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.