⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | गुन्हे | अडावद येथील तरुणाच्या हत्येचा उलगडा; हत्येमागील कारण काय?

अडावद येथील तरुणाच्या हत्येचा उलगडा; हत्येमागील कारण काय?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२४ । चोपडा तालुक्यात खुनाच्या घटना वाढताना दिसत असून यातच अडावद (ता अडावद) येथील बापू हरी महाजन (३५) या तरुणाचा खून झाल्याची घटना दोन दिवसापूर्वी उघडकीस आली. आता या खून प्रकरणात एका अल्पवयीनासह तरुणास ताब्यात घेण्यात आले आहे.

तंबाखू मागितल्याच्या क्षुल्लक कारणावरून घडलेल्या या खून प्रकरणाने अडावद गाव हादरले आहे. राज सुरेश महाजन (१९, रा. अडावद, ता. चोपडा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. तर अल्पवयीनाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. लोखंडेनगरात राहणाऱ्या बापू महाजन याचा लाकडी दांड्याने तसेच दगडाने ठेचून खून झाल्याची घटना १ रोजी सकाळी भगवाननगरात उघडकीस आली होती.

याप्रकरणी मृत तरुणाचे मामा शांताराम पुना महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी रात्री अज्ञातांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. अडावद पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशय वाटला. त्याआधारे ११ तासात संशयितांना ताब्यात घेण्यात आले. अडावदचे सपोनि. प्रमोद वाघ, पोउनि, राजू थोरात, शरीफ तडवी, भरत नाईक, सतीश भोई, भूषण चव्हाण, किरण शिरसाठ, शेषराव तोरे, शुभम बाविस्कर, मुकेश तडवी, संजय धनगर, विनोद धनगर, चंद्रकांत कोळी आदींनी तपासात कामगिरी केली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.