चारठाणा येथे २९ सप्टेंबरला छायाचित्रकारांचा सोहळा
जळगाव लाईव्ह न्यूज । चार वर्षांपूर्वी चार-पाच मित्र एकत्र येऊन सोहळा मैत्रीचा क्षण आठवणीचे हा एक आगळावेगळा कार्यक्रम सुरू करण्यात आला. आज हा कार्यक्रम भारतभरातील छायाचित्रकारांचे हक्काचे व्यासपीठ बनला आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा येथील श्री क्षेत्र भवानी मंदिर येथे या वर्षीही रविवार २९ सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम पार पडणार आहे. या हजारोंच्या संख्येनं छायाचित्रकार उपस्थित राहणार आहे.
नेमका हा कार्यक्रम कशासाठी घेतल्या जातो, यामागील उद्देश समजून महाराष्ट्रातील फोटोग्राफर व्हिडिओग्राफर यांनी सोहळा मैत्रीचा हा कार्यक्रम आयोजित केला. फक्त व्हाट्सअप डिझाईन तयार करून ती फोटोग्राफरच्या ग्रुपवर व्हाट्सअपच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून फोटोग्राफर-व्हिडिओग्राफरपर्यंत पोहोचविल्या जाते.
कुठलेही आग्रहाचे निमंत्रण न देता या एका छोट्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. कार्यक्रमाला अनेक राज्यातून या कार्यक्रमाला फोटोग्राफर, व्हिडिओ ग्राफर उपस्थित दर्शवितात. जास्तीत जास्त फोटोग्राफर, व्हिडीओग्राफरने या सोहळ्याला उपस्थिती राखावी असे आवाहन सोहळा मैत्रीचा या टीममार्फत करण्यात आले आहे.