⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 15, 2024
Home | गुन्हे | नोकरी टिकवायची असेल तर १० हजार द्या, अन्यथा..; लाच प्रकरणी मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा

नोकरी टिकवायची असेल तर १० हजार द्या, अन्यथा..; लाच प्रकरणी मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२४ । धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पारोळ्यात कारवाई केली आहे. शैक्षणिक संस्थेत नोकरी टिकवायची असेल तर प्रत्येक शिपाईला १० हजार देण्याची मागणी करून लाच मागणाऱ्या मुख्याध्यापक गौतम मिसर यांच्याविरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

नेमका काय आहे प्रकार?
तकारदार हे नागरी एज्युकेशन सोसायटी गर्ल्स हायस्कुल, पारोळा येथे सन २०११ पासुन शिपाई या पदावर कार्यरत आहे. संस्थेचे चेअरमन मिलींद मिसर यांचे भाऊ गौतम मिसर हे सदर संस्थेच्या बॉईज हायस्कुलमध्ये उपशिक्षक या पदावर कार्यरत होते. त्यांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती झाली आहे. गौतम मिसर यांनी सदर संस्थेत कार्यरत असलेल्या तक्रारदार यांचेसह सर्व शिपायांना त्यांच्याकडे बोलावुन घेतले. त्या सर्वांना संस्थेच्या चेअरमन पदावर त्यांचे भाऊ मिलींद मिसर यांची नियुक्ती झाली असुन या संस्थेत नोकऱ्या टिकवायच्या असतील तर प्रत्येक शिपायास प्रत्येकी १०,०००/- रूपये जमा करावे लागतील अन्यथा तुम्हाला नोकरीत त्रास होईल असे सांगीतले होते.

मुख्याध्यापक गौतम मिसर यांच्या मागणीप्रमाणे तकारदार यांना लाच देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे कार्यालयाकडे दि.०९ फेब्रुवारी २०२४ रोजी तकार केली होती. सदर तकारीची पडताळणी दरम्यान संशयित आरोपी मुख्याध्यापक मिसर यांनी तक्रारदार यांचेकडे १० हजार रुपये लाचेची मागणी करुन शाळेतील उप शिक्षक सचिन पाटील यांच्याकडे देण्यास सांगीतले. तसेच दि.१२ फेब्रुवारी रोजी सापळा कारवाई आयोजीत केली असता सदर कार्यवाही दरम्यान मुख्याध्यापक गौतम मिसर यांनी सदर लाचेची रक्कम शाळेतील उप शिक्षक धर्मेंद्र शिरोडे यांच्याकडे देण्यास सांगीतले. परंतु तकारदार यांना मुख्याध्यापक गौतम मिसर यांच्या सांगण्याप्रमाणे इतरांकडे लाचेची रक्कम देण्याची ईच्छा नसल्याने सदरची कार्यवाही स्थगीत करण्यात आली होती.

मुख्याध्यापक गौतम मिसर यांनी तकारदार यांच्याकडे दि.१० व दि.१२ फेब्रुवारी २०२४ रोजी १० हजार रूपये लाचेची मागणी केली म्हणुन त्यांचे विरुध्द पारोळा पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. स

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.