⁠ 
मंगळवार, सप्टेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | युवकांच्या स्वप्नांना योग्य प्रारंभ देण्यासाठी भारत सरकार नेहमी तयार : माजी खा. पूनम महाजन

युवकांच्या स्वप्नांना योग्य प्रारंभ देण्यासाठी भारत सरकार नेहमी तयार : माजी खा. पूनम महाजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२४ । डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि धर्मदाय रुग्णालय येथे भारत महासत्ता निर्मितीत आपला सहभाग युवक संवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून माजी खासदार पूनम महाजन या उपस्थित होत्या तर मंचावर माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील उपस्थित होते.

यावेळी पुनम महाजन यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, २०४७ ला भारतीय स्वातंत्र्याची शताब्दी आहे. १९४७ ला स्वातंत्र्यासाठी अनेकांनी फटके खाल्ले आणि अनेक जण हुतात्माही झाले. भारताच्या स्वातंत्र्याच्या शतकाला २३ वर्ष बाकी आहेत. भारताला जागतिक महासत्ता झालेले बघायचे असेल तर तरुणांनी आपली स्वप्ने भारताशी जोडले पाहिजे. भारत महासत्ता झाल्यानंतर संधी उपलब्ध होणारच आहे. भारत स्वतंत्र होण्यासाठी जे झटले त्याचे फळ २०४७ च्या रूपात आपल्याला बघायला मिळणार आहे. २०१४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेताना हे सरकार युवक आणि महिलांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले होते.

युक्रेन आणि रशिया च्या संघर्षामध्ये भारत मध्यस्थी करेल असे कोणालाही वाटले नव्हते. २०१४ नंतर हे घडायला सुरुवात झाली. कोविड मध्ये भारत निर्मित लस जगात सर्वोत्तम ठरल्या. आपण सर्व मिळून भारताला पुढे नेऊ असे सांगितले. यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे पूनम महाजन यांनी दिली. समारोपीय भाषण माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी केले तर प्रस्ताविक वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. प्रशांत साळुंके यांनी केले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.