⁠ 
सोमवार, सप्टेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | कष्टकरी वर्गाला शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी कटीबद्ध; आमदार राजूमामा भोळे यांचे प्रतिपादन

कष्टकरी वर्गाला शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी कटीबद्ध; आमदार राजूमामा भोळे यांचे प्रतिपादन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कामगार महिला, पुरुषांसाठी गृहोपयोगी साहित्य संच वाटप कार्यक्रम उत्साहात

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२४ | जळगाव येथील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडलतर्फे बांधकाम कामगार महिला व पुरुषांसाठी मोफत गृहोपयोगी साहित्य संच (भांडे) वाटप कार्यक्रम नूतन मराठा विद्यालय सभागृह येथे पार पडला. कष्टकरी वर्गाला शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी कटीबद्ध असून कष्टकऱ्यांचे देशाच्या विकासात अमूल्य योगदान आहे, असे प्रतिपादन शहराचे आ. राजूमामा भोळे यांनी व्यक्त केले.

शहरातील कामगार महिला व पुरुषांची यावेळी मोठ्या संख्येने नूतन महाविद्यालयाच्या सभागृहात उपस्थिती होती. प्रसंगी भाजपाच्या महानगर अध्यक्ष उज्वला बेंडाळे, प्रवासी कार्यकर्ता विक्रम भाई, जयेश भावसार, स्मिता वैद उपस्थित होतें. यावेळी आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते कामगार बांधवाना भांडी वाटप करण्यात आली. सदर योजनेमुळे कष्टकऱ्यांना संसारात मोठा हातभार लागला आहे. गृहोपयोगी साहित्य संच मिळाल्याने अनेक महिला व पुरुष कामगारांनी आ. राजूमामा भोळे यांचे आभार मानले.

कष्टकरी व्यक्तींच्या आयुष्यात प्रत्येक दिवस महत्वाचा असतो. रोज काम करणार तर रोज मजुरी मिळणार अशी स्थिती असल्यामुळे त्यांना हातभार म्हणून सरकारी योजना महत्वाच्या असतात. यासाठी आज कामगारांना गृहोपयोगी साहित्य संच वाटप करण्यात आले आहे, असे यावेळी आ. राजूमामा भोळे यांनी सांगितले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.