अरे देवा! जळगाव जिल्ह्यातील शेकडो शिधापत्रिकाधारकांचे मोफत रेशन बंद; कारण काय?
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२४ । सरकारकडून गोरगरीब कुटुंबांना स्वस्त दरात राशन पुरविले जात आहे. एकीकडे काहींना स्वस्त धान्य योजनेचा लाभ मिळत नाही, तर दुसरीकडे स्वस्त धान्य योजनेत नाव असूनही काही जण त्याचा लाभ घेत नाही. त्यामुळे अशा शिधापत्रिकाधारकांचे मोफत रेशन बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
या निर्णयाचा जळगाव जिल्ह्यामधील बोदवड तालुक्यातील १९२ रेशनकार्डधारकांना फटका बसेल. एकीकडे स्वस्त धान्य योजनेच्या यादीत बसत असूनही वाढीव कोटा अथवा ऑनलाइन शिधापत्रिकामध्ये नाव येत नसल्याने या योजनेच्या लाभार्थीना स्वस्त धान्य योजनेचा लाभ मिळत नाही. तर दुसरीकडे स्वस्त धान्य योजनेत नाव समाविष्ट असूनही धान्य योजनेचा लाभ मिळत आहे.
या योजनेत धान्याचा लाभ न घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांचे लाभ बंद करून प्रतीक्षा यादीत असलेल्या लाभार्थीचा समावेश करण्याची प्रक्रिया पुरवठा विभागाने सुरू केली आहे. जानेवारी ते जून २४ पर्यंत धान्य न घेणारे तालुक्यात १९२ कार्डधारक आहेत.