⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | शरद पवार शनिवारपासून दोन दिवस जळगाव, धुळे जिल्हा दौऱ्यावर ; असे आहे कार्यक्रमाचे नियोजन

शरद पवार शनिवारपासून दोन दिवस जळगाव, धुळे जिल्हा दौऱ्यावर ; असे आहे कार्यक्रमाचे नियोजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२४ । आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कंबर कसली असून पक्षबळकटीसाठी राज्यभरात दौरे करत आहे. यातच शरद पवार हे शनिवार, २१ रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दोन दिवसांच्या दौऱ्यात त्यांचा सभा, बैठका असा कार्यक्रम होणार आहेत. या दौऱ्यात ते विधानसभेसाठीचे उमेदवार जाहीर करणार असल्याची शक्यता आहे.

शनिवारी दि. २१ रोजी सकाळी ११ ते एक चाळीसगाव येथे धुळे बायपास रोडवरील विराम लॉन्स येथे जाहीर सभेला ते संबोधन करतील. दुपारी दोन वाजता चाळीसगाव येथुन त्यांचे जामनेरकडे प्रयाण होईल. दुपारी ४.३० वाजता जामनेर येथील बोहरा मंगल कार्यालयात त्यांची जाहीर सभा होईल. संध्याकाळी ६.३० वाजता जामनेर येथुन ते बोदवडकडे प्रयाण करतील. संध्याकाळी सात वाजता बोदवड येथे गांधी चौकात त्यांच जाहीर सभा होईल. त्यानंतर त्यांचा जळगाव येथे मुक्काम होईल.

रविवार, २२ रोजी सकाळी ९.३० वाजता त्यांचे चोपडाकडे रवाना होतील. सकाळी ११ ते १ दरम्यान चोपडा येथे गोभी जिनिंग मिल, सुंदर गडीरोड येथे जाहीर सभा होईल. दुपारी दोन वाजता चोपडा येथुन ते शिरपूरकडे तर दुपारी ३.३० ते ५.३० वाजता शिरपूर पाच कंदील विजय स्तंभ येथे ते जाहीर सभेला संबोधन करतील. संध्याकाळी ६.३० वाजता त्यांचे दोंडाईचा येथे आगमन होईल. सायंकाळी ६.३० वाजता दोंडाईचा येथे निर्मल एंपोरियम जवळ छत्रपती शिवाजी महाराज रोड येथे जाहीर सभा होईल. त्यानंतर त्यांचे धुळ्याकडे प्रयाण होईल.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.