⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | गुन्हे | एक लाखाची लाच घेताना पारोळ्याच्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटरला अटक

एक लाखाची लाच घेताना पारोळ्याच्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटरला अटक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२४ । लाचखोरीच्या एक मोठी बातमी पारोळा तालुक्यातून समोर आलीय. जळगाव लाचलुचपत विभागाने कामाची वर्कऑर्डर काढण्यासाठी १ लाखाची लाच घेणाऱ्या पारोळा पंचायत समिती कार्यालयातील ग्रामविस्तार अधिकारीसह कंत्राटी सेवकाला रंगेहात पडकले. सुनील अमृत पाटील (वय-५८) असं ग्रामविस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे तर कल्पेश ज्ञानेश्वर बेलदार (वय-२८) असं कंत्राटी सेवकाचे नाव असून या कारवाईने मोठी खळबळ उडाली. दोघं लाचखोरांविरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

नेमका प्रकार काय?
धुळ पिंप्री (ता.पारोळा) येथील तक्रारदार रहिवासी असून ग्रामपंचायत येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत काँक्रीट व पेवर ब्लॉक करण्याचे एकूण एकूण ४ कामे प्रत्येकी १५ लाख रुपये प्रमाणे ६० लाखांचे काम शासनाकडून मंजूर होऊन आले होते. या कामाची वर्क ऑर्डर काढण्यासाठी पारोळा पंचायत समिती कार्यालयातील कंत्राटी सेवक कल्पेश बेलदार याने ग्रामविस्तार अधिकारी सुनील पाटील यांच्यासाठी दोन टक्के आणि स्वतःसाठी एक टक्का याप्रमाणे १ लाख ८० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.

दरम्यान तक्रारदार यांनी या संदर्भात जळगाव येथील लाच लुचपत विभागाला तक्रार दिली. त्यानुसार पथकाने पळताडणीसाठी आज शुक्रवारी २० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता सापळा रचला. यावेळी तडजोडी अंती १ लाख रुपये देण्यासाठी लाचेची रक्कम ठरली. त्यानुसार कंत्राटी सेवक कल्पेश बेलदार याने पंचासमोर १ लाख रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले. या संदर्भात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या कारवाईमुळे पारोळा पंचायत समिती कार्यालयात आणि तालुक्यात खळबळ उडाली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.