जळगाव जिल्हा

गणपती विसर्जन दिवशी जळगाव शहरात गाडीने येताय? आधी बातमी वाचून घ्याल..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ संप्टेंबर २०२४ । लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा क्षण जवळ येतोय. दहा दिवसांच्या गणपतीचं उद्या म्हणजेच मंगळवारी (ता१७) अनंत चतुर्दशीला विसर्जन केलं जाणार आहे. यासाठी जळगाव शहरातील गणेश मंडळ कार्यकर्त्यांसह पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. गणपती विसर्जन दिवशी जळगाव शहरातील काही रस्ते बंद तर काही रस्त्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. तुम्हीही उद्या जळगावमध्ये येत असला तर ही बातमी आधी वाचून घ्याल.. जेणे करून तुमची गैरसोय दूर होईल

विसर्जन मिरवणुकी शांततेत पार पडण्यासाठी पोलिसांकडून अतिरिक्त कुमक मागविण्यात आली आहे. तसेच विसर्जन मिरवणुक मार्गावर खास ८२ उच्च प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून त्याद्वारे उपद्रवींसह टवाळखोरांवर लक्ष राहणार आहे. त्याचप्रमाणे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी दरवर्षीप्रमाणे कोर्ट चौकातील जीएस मैदानावरून नंबर लावावा लागणार आहे.

…असे आहेत मार्गांतील बदल
इच्छादेवी चौकी – डी मार्ट – मोहाडी रोड वाय पॉइंट – गायत्रीनगर – गणेश घाट – सेंट टेरेसा स्कूल – हॉटेल गॅपेस – मलंगशहा बाबा दर्गा – शिरसोली रोडवरील वाहतूक जळगावकडे येणाऱ्या व जाणाऱ्या एसटी बसेस व इतर सर्व प्रकारच्या अवजड वाहनांसाठी विसर्जनाच्या दिवशी बंद राहील. तसेच जळगाव ते पाचोरा येणारी व जाणारी वाहतूक (हलक्या व मध्यम वाहनासाठी) – इच्छादेवी चौकी- डी मार्ट- मोहाडी रोड वाय पॉइंट- गायत्रीनगर – गणेश घाट- सेंट टेरेसा स्कूल- हॉटेल ग्रॅपेस – मलंगशहा बाबा दर्गा – शिरसोली रोडवरील वाहतूक जळगावकडे येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व मध्यम व हलक्या वाहनांसाठी मार्ग बंद राहील.

अवजड वाहने नेरीमार्गे
पाचोऱ्याकडून येणाऱ्या जड वाहनांसाठी वावडदा- नेरी- अजिंठा चौकमार्गे पर्यायी मार्ग असेल, असेही डॉ. रेड्डी आपल्या आदेशात म्हटले आहे.

या मार्गाने जातील वाहने
जळगावकडून पाचोऱ्याकडे जाणाऱ्या व येणाऱ्या कार व मोटारसायकलींसाठी आकाशवाणी चौक – काव्यरत्नावली चौक – महाबळ चौक – संत गाडगेबाबा चौक – राजे संभाजी चौक (मोहाडी रोड)- गुरू पेट्रोलपंप- मलंगशहा बाबा दर्गा या पर्यायी मार्गाने जातील.

कोर्ट चौक ते भिलपुरा चौकी रस्ता दिवसभरासाठी बंद
आसोदा- भादलीकडून जळगावकडे येणाऱ्या व जाणाऱ्या एसटी बस व इतर सर्व वाहने मंगळवारी (ता..१७) सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत या कालावधीत मोहन टॉकीज- गजानन मालुसरे नगर- जुने जळगाव- लक्ष्मी नगर- कालंका माता मंदिर मार्गे – महामार्गावरून अजिंठा चौक- आकाशवाणी चौक – नवीन बसस्थानक या पर्यायी मार्गाचा वापर करतील.

शहरात प्रवेश बंद
मिरवणुकीस अडथळा येऊ नये यासाठी ममुराबाद कडून येणारी वाहतूक शिवाजीनगर मार्गे कानळदा रोड आणि तेथून नवीन रेल्वे उड्डाण पुलावरून रिंगरोड, आकाशवाणी चौक मार्गे वळवण्यात येत आहे. या वाहनांना शहरात प्रवेश करता येणार नाही. बेंडाळे महिला महाविद्यालय पासून ते गोविंदा रिक्षा स्टॉप-नेहरु चौक मार्गे भिलपुरा चौका पर्यंत बॅरीकेटींग आणि बांबूचे पोल उभारून वाहनांना प्रवेश बंद असेल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button