जळगाव लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२४ । धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते तब्बल 1350 मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाषणात माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
बरेच राजकारणी लोक माझ्यावर टीका करतात आणि मी सायकल देतो तुम्ही टायर तर देऊन बघा. कपाळ करंट्यानहो तुम्हाला करता आलं नाही. तुम्हाला फक्त मजूर फेडरेशनच कमिशन घेता येतं. बाकी दुसरं काही करता येत नाही. कमिशनमधून थोडं वाट ना बाबा, दोन हजारांची पावती फाडतो आणि चार वेळेस मोबाईल आणि व्हाट्सअपवर टाकतो”, अशा शब्दांत मंत्री गुलाबराव पाटील यांनी गुलाबराव देवकर यांच्यावर हल्लाबोल केला.
त्यावेळेस वडिलांनी मला खूप बदडलं ; मंत्री गुलाबराव पाटील
“सायकलीची मला पण लहानपणी आवड होती. एकदा भाड्याने सायकल घेतली. 50 पैसे तेव्हा भाडं होतं. अर्ध्या तासाचं भाडं होतं. मात्र मी एकटाच सायकल फिरवली आणि 25 पैसे दिले. त्यामुळे सायकलवाल्याने माझ्या वडिलांना तक्रार केली आणि माझ्या वडिलांनी मला खूप बदडलं. तो मार खाणारा गुलाबराव पाटील आज बहिणींना सायकल वाटप करतो ही हीच मोठी आनंदाची बाब आहे.
“आमच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी महिला, मुलींसाठी खूप काही केलं आहे. हे सरकार सुद्धा मुली आणि महिलांच्या पाठीशी उभं आहे. लाडकी बहिण योजना, महिलांना अर्ध टिकीट केलं. मोठ्या आनंदात महिला भगिनी बसने प्रवास करतात. हे एकनाथ शिंदेने केलं दाढीवाल्याने, ते बी दाढीवाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी बी दाढीवाले आणि गुलाबराव दाढीवाले. लाईन लगी है सब”, .. “देशातलं एकमेव राज्य आहे की ज्या ठिकाणी मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय म्हणजे एकनाथ शिंदे दाढीवाल्याने घेतला आहे.
“असा कोणता मुख्यमंत्री आहे की तो १३ वेळेस एका जिल्ह्यामध्ये येतो? मात्र जळगाव जिल्ह्यामध्ये आला त्याचं नाव एकनाथराव शिंदे आहे. देण्याची दानत माझ्या नेत्यांमध्ये आहे आणि हेच गुण आमच्यामध्ये आहे. जसं पाण्याचा उगम होतो आणि ते वाहत राहतं त्या पद्धतीने एकनाथराव शिंदे आमचा स्त्रोत आहे आणि त्या ठिकाणाहून आमचा उगम झाला आहे असंही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले