जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२४ । मागील गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदी दरात मोठा बदल पहायला मिळाला. गेल्या आठवड्याच्या अखेरच्या सत्रात सोन्याने 550 रुपयांची मुसंडी मारली होती. त्यापूर्वी किंमतीत घसरणीचे सत्र होते. या आठवड्याची सुरुवात स्वस्ताईने झाली.
तर दुसऱ्या दिवशी सोने 440 रुपयांनी उतरले. सोमवारी, 9 सप्टेंबर रोजी किंमती स्थिर होत्या. तर आज सकाळच्या सत्रात घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,950 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,020 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
मागील काही दिवसांपासून चांदीत मोठी घसरण दिसून येत आहे. 6 सप्टेंबर रोजी चांदी 2 हजार रुपयांनी उसळली. 7 सप्टेंबर रोजी 2,500 रुपयांनी किंमती उतरल्या. तर सोमवारी 9 सप्टेंबर रोजी किंमतीत 500 रुपयांची वाढ झाली. आज सकाळच्या सत्रात चांदीत दरवाढीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 85,000 रुपये आहे.