जळगाव जिल्हा

शाडु मातीच्या गणपती बनवण्याची कार्यशाळा; गोदावरी आयएमआरचा उपक्रम

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ सप्टेंबर २०२४ । जळगाव येथील रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी इलाईट तर्फे आयोजित शाडू मातीची गणेश मूर्ती कार्यशाळेचे गोदावरी आय एम आर महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेत १०० च्यावर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पर्यावरण मित्र गोवर्धन पवार यांनी मार्गदर्शन केले व शाडू माती पासून गणेश मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. पाच-पाच च्या ग्रुपने विद्यार्थ्यांनी एक शाडू मातीची गणपति मूर्ति बनवली.शाडू माती पर्यावरणपूरक आहे, तसेच कोणत्याही घातक रसायानाचा अंश या मातीत नाही. त्यामुळे या मूर्तीचे विघटन अतिशय सोप्या पध्दतीने होते. मूर्ती विसर्जनानंतर ती पूर्णपणे विरघळते व कोणताही रासायनिक वा जैविक प्रभाव जलस्त्रोतावर होत नाही या गोष्टीन्चे महत्व मूर्तिकार गोवर्धन पवार यांनी सांगितले. रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी इलाईट चे समन्वयक प्रा. प्राजक्ता पाटील आणि प्रदन्या बाविस्कर यांच्या मार्गदर्शनानुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा—यांनी परिश्रम घेतले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button