⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | महिन्याभरात सोने 1900 रुपयांनी महागले; जळगावात आज असे आहेत भाव?

महिन्याभरात सोने 1900 रुपयांनी महागले; जळगावात आज असे आहेत भाव?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ सप्टेंबर २०२४ । जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मांडण्यात आलेल्या देशातील अर्थसंकल्पात सोने आणि चांदी दरावरील सीमा शुल्कात मोठी कपात करण्यात आल्यानंतर दोन्ही धातूंच्या किमतीत मोठी घसरण झाली होती. सोन्याचा दर ७५ वरून ७० हजाराखालीआले होते तर चांदीचा दर ९४ हजारावरून ८३ हजारावर आली होती. मात्र ऑगस्ट महिन्यात दोन्ही धातूंमध्ये चढ उतार दिसून आली. सध्या २४ कॅरेट सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ७२,४०० रुपये इतका आहे. तर चांदीचा दर ८५००० रुपये प्रति किलो इतका आहे.

गेल्या महिन्याभरात सोने १९०० रुपयांनी महागले. १ ऑगस्टला ७०७०० रुपये प्रतितोळा असलेले सोने ३१ ऑगस्टला ७२४०० वर पोहोचले. १४ ऑगस्टला आठशे रुपयांनी वाढून ७१,५०० पर्यंत पोहोचले. लगेच दुसऱ्या दिवशी त्यात ९०० रुपयांची घसरण होऊन पुन्हा ७०,७०० रुपयांवर आले. त्यानंतर साधारण दररोज वाढ होऊन महिनाअखेरीस ७२४०० रुपयांवर स्थिरावले आहे. त्याचप्रमाणे ऑगस्टच्या सुरुवातीला ८५ हजार रुपये किलो असलेले चांदीचे दर दोन हजारांनी वाढून आठवडाभर ८७ हजारांवर होते.

मात्र, ३१ ऑगस्टला २ हजारांची घसरण होऊन ते ८५००० हजारांवर आले आहे. सोन्याच्या दरातील वाढ ही नैसर्गिक आहे; परंतु त्यासोबत गुंतवणुकीतून नफा कमवणाऱ्यांमुळे तेजी-मंदी येत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान, पुढील आठवड्यात गणेशोत्सव आहे. या कालावधीत काही प्रमाणात सोने, चांदीचे भाव वाढण्याचाही अंदाज वर्तवण्यात येतो आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.