⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | गुन्हे | जळगावात कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा, ५ पीडित महिलांची सुटका, दोघांवर गुन्हा दाखल

जळगावात कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा, ५ पीडित महिलांची सुटका, दोघांवर गुन्हा दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२४ । जळगाव शहरातील एका हॉटेल व लॉजिंगवर सुरु असलेल्या कुंटणखान्यावर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत ५ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून याप्रकरणी हॉटेलचे मालक-चालकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव एमआयडीसीतील सेक्टर जी सेक्टरमध्ये असलेले सागर हॉटेल व लॉज येथे बेकायदेशीर पध्दतीने कुंटणखाना सुरू असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार २७ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता छापा टाकला. या कारवाईत पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी वेश्याव्यवसाय चालवण्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. पोलीस कॉन्स्टेबल सपना येरगुंटला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हॉटेलचे मालक सागर नारायण सोनवणे (रा. जळगाव) आणि चालक सागर सुधाकर पाटील या दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय बडगुजर, पोलीस नाईक विकास सातदिवे, महिला पोलीस कॉन्स्टेबल सुनंदा तेली, पोहेकॉ मुकुंदा पाटील, रामदास कुंभार, विनोद भास्कर, भरत डोके यांच्यासह इतरांनी केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करीत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.