संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी अभियान अंतर्गत राज्यस्तरीय कार्यशाळा उत्साहात
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२४ । ग्राम विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी अभियान तसेच राज्य शासनाच्या विविध विभागांच्या योजनांचा फायदा बंजारा लमाण समाजाला कसा मिळेल याबाबत विचारमंथन करन्यासाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने आज दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी जळगाव कस्तुरबा सभागृह, गांधी तीर्थ ,जैन हिल्स जळगाव येथे कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेमध्ये संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी अभियान योजने अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील जिल्हास्तरीय समितीमधील अशासकीय सदस्य हजर होते. सदर कार्यशाळा सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालली. या कार्यशाळेमध्ये संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी अभियान योजनेअंतर्गत आराखडा कसा तयार करावा, तांड्यांना महसुली दर्जा देणे व तेथे ग्रामपंचायत स्थापन करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तसे तांड्यांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विकास आराखडा कसा परिपूर्ण असावा याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
सदर कार्यशाळे करिता राज्यभरातून अशासकीय समिती सदस्य हजर होते .या कार्यशाळेमध्ये समाजाकरिता असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली .या कार्यशाळेला बंजारा समाजातील अनेक संत महंत जसे की पोहरादेवी संस्थान चे महंत बाबू सिंग महाराज, जितेंद्र महाराज, सुनील महाराज, सुरेश महाराज,श्याम चैतन्य महाराज, निरू महाराज,आमदार निलय नाईक, रामेश्वर नाईक हे हजर होते. ग्रामविकास विभागाचे उपसचिव पंडित जाधव यांनी तांडा समृद्धी योजनेबाबता मार्गदर्शन केले.डॉ जगदीश सकवान यांनी योजने अंतर्गत आराखडे कसे तयार करावे याचे मार्गदर्शन केले .
छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषद येथील अधिकारी कर्मचारी यांनी उपस्थितांना पुढील योजनाची माहिती दिली, जसे की, माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या विजाभज प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती. ओबीसी, VJNT आणि SBC प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसायीक प्रशिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती (राज्य योजना). मॅट्रीक पुर्व शिष्यवृत्ती, माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या विजाभज प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती, मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती.महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर.वसंतराव नाईक ताडा वस्ती सुधार योजना. संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृध्दी योजना.वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.) मुंबई.राज्यातील इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा निहाय वस्तीगृह सुरु करणे. विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठीच्या आश्रमशाळा.विजाभज विद्यार्थ्यांना शिक्षण आणि परिक्षा शुल्क (राज्य योजना). व्यवसायीक पाठक्रमाशी सलग्न असलेल्या वस्तीगृहातील निवासी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता प्रदान करणे (विजाभज इमाप्र) (राज्य योजना.गुणवत्त मुला-मुलीना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना . अशा विविध योजनांबाबत माहिती देण्यात येवून उपस्थितांच्या शंकेचे निरसन केले.तसेच या योजनाची माहिती पुस्तिका देखील सर्वांना वाटप करण्यात आली.
कार्यक्रमाला विभागाचे सचिव माननीय एकनाथ डवले सर यांनी हजेरी लावली. राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दूरदृश्य प्रणाली द्वारे कार्यशाळेत मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे सूत्र संचालन सुप्रिया साळुंखे आणि लोहाड सर यांनी केले.तर आभारप्रदर्शन डॉ सुनिल भोकरे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजी नगर यांनी केले.