⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन ; यावल येथे चार दुकाने सील

 

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२१ ।कोरोना संदर्भात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याने चार व्यवसायिकांवर दंडात्मक कारवाई करत चारही दुकाने सील करण्यात आले आहे. ही कारवाई तहसीलदार महेश पवार आणी पोलीस निरीक्षक सुधीर पाटील आणी नगर परिषद प्रशासन यांच्या माध्यमातुन आज शहरात रस्त्यावर उतरून केली. 

 

जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोख वर काढले असून रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  जिल्हाधिकारी यांनी शासनाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या विरूद्ध कारवाई बडगा उगारला आहे. आज यावलचे तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार, पोलीस निरिक्षक सुधीर पाटील, नगर परिषद प्रशासनचे विजय बढे, स्वच्छता अधिकारी शिवानंद कानडे यांच्या पथकाने संयुक्त कारवाई केली.

यात शहरातील बुरूज चौकातील पटेल सेन्टर, पापुलर झेरॉक्स व स्टोअर्स, बसस्टॅन्ड परिसरातील जय हिंगलाज स्विट ॲण्ड नास्ता सेन्टर या व्यवसायीकांवर ५ पेक्षा अधिक लोकांना जमविणे तसेच मास्कचा वापर न करणे अशा कोरोना नियमांचे उल्लंघन करतांना आढळुन आल्याने त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करीत त्यांच्या दुकांनासिल करण्यात आले आहे . महसुल प्रशासन , पोलीस आणी नगर परिषदच्या संयुक्त कारवाईचा यावल शहरातील बेसावध व बेशिस्त वागणाऱ्यावर या धडक कारवाईचा चांगलाच परिणाम झाल्याचे दिसुन येत आहे.