जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२४ । सणासुदीच्या काळात सोने आणि चांदीत दरवाढ नित्याचीच बाब असून यावेळी रक्षाबंधनापूर्वी सोने आणि चांदीने उसळी घेतली. मागील गेल्या आठ दिवसात सोने जवळपास दोन हजार रुपयांनी वधारले आहे. चांदी दर देखील दोन हजार रुपयांहून अधिकने वाढला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला देखील सोने दरात वाढ झालीय. यामुळे आगामी दिवसात सोने कुठंवर जाणार याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
जळगावात आज काय आहेत भाव?
जळगावच्या सुवर्णपेठेत गेल्या आठ दिवसापूर्वी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ७०,६०० रुपये इतका होता.तर चांदी ८३००० हजारावर होती. मात्र गेल्या आठवड्यात सोन्याने मोठी भरारी घेतली. सोने दरात तब्बल १९०० रुपयाची वाढ झाली. काल रक्षाबंधनाच्या दिवशी देखील सोने दरात २०० रुपयापर्यंतची वाढ दिसून आली. यामुळे आज सकाळच्या सत्रात सोने विनाजीएसटी ७२,५०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे. चांदी दर ८५००० हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यात केंद्राने अर्थसंकल्पात सीमा शुल्कात कपात केल्याने सोन्याचा दर घसरून ६९ हजाराच्या घरात आले होते. तर चांदीचा दर ८२ हजारावर आले होते. यामुळे खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला होता. आगामी सणासुदीत देखील सोन्याचा दर आणखी घसरेल अशी अपेक्षा ग्राहकांना होती. मात्र रक्षाबंधनापूर्वी दोन्ही धातूंमध्ये मोठी उसळी दिसून आली.