⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; आज ‘या’ जिल्ह्यात कोसळणार पाऊस? जळगावात कशी राहणार स्थिती?

राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; आज ‘या’ जिल्ह्यात कोसळणार पाऊस? जळगावात कशी राहणार स्थिती?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२४ । ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने चांगलंच झोडपून काढलं. मात्र यानंतर मागील काही दिवसापासून पावसाने उसंती घेतली आहे. पावसाने विश्रांती घेताच दुसरीकडे तापमानात वाढ झाली आहे.अशातच राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

आज शुक्रवारपासून राज्यातील काही भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे. यात जळगाव जिल्ह्यात देखील रिमझिम पावसाची शक्यता आहे.

या जिल्ह्यात कोसळणार पाऊस?
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव आणि परभणी जिल्ह्याला पावसाचा इशारा देण्यात आलाय. विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, परतवाडा, अकोट, अचलपूर, वर्धा, नागपूर शहरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह उपनगर आणि कोकणालाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. दुसरीकडे अहमदनगर, नाशिक नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यातही रिमझिम पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, यंदा जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या. मात्र, जुलै महिना सुरु होताच मान्सूनने जोर पकडला. अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झाला. आता पावसाने पुन्हा उसंत घेतली. परंतु अचानक गायब झालेला पाऊस पुन्हा परतण्याची शक्यता आहे.

जळगाव जिल्ह्यातील देखील ऑगस्टच्या सुरुवातीच्या काही दिवसात दमदार पाऊस झाला खरं पण जिल्ह्यातील काही मोठ्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झालेला नाहीय. यामुळे जळगावकरांची चिंता वाढली आहे. परंतु अचानक गायब झालेला पाऊस पुन्हा परतण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा वाढणार कि नाही याकडे जिल्हावासियांचं लक्ष लागले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.