जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑगस्ट २०२४ । जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसापासून पावसाची रिपरिप सुरु होती. ढगाळ वातावरणामुळे तापमानात ३० अशांवर होते. मात्र या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतली. भारतातील ईशान्यकडील भागावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला झाल्यामुळे पावसाला काहीसा ब्रेक लागलेला आहे.
पावसाने उसंती घेतल्याने तापमानात वाढ झाली आहे. बुधवारी पारा ३३ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. दरम्यान, १५ ते २० ऑगस्ट या कालावधीत उन्ह- सावलीच्या खेळामध्ये पुढील काही दिवस उघडीप राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३२ ते ३३ डिग्री सेल्सिअस दरम्यान राहील. तर किमान तापमान २५ ते २६ डिग्री सेल्सिअस दरम्यान राहील. हलक्या श्रावण सरी म्हणजेच अत्यंत तुरळक पावसाची शक्यता आहे.
२२ ऑगस्टपासून हवामान बदल होऊन महिन्याच्या अखेरीस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात आर्द्रत ६५ ते ७० टक्क्यांपर्यंत राहील. त्यामुळे तापमान कमी असतानाही उकाडा जाणवणार आहे. बुधवारी तापमान ३३ अंशांवर पोहोचल्यामुळे उकाडा जाणवल्याचे हवामान अभ्यासक यांनी सांगितले.