⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | आठवड्याअखेर सोन्याच्या दराने घेतली उसळी; आता काय आहेत दर जाणून घ्या..

आठवड्याअखेर सोन्याच्या दराने घेतली उसळी; आता काय आहेत दर जाणून घ्या..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑगस्ट २०२४ । सोने आणि चांदी दरात चढ उतार सुरूच आहे. गेल्या आठवड्यात सोने आणि चांदी दरात वाढ झाल्यानंतर या आठवड्यात दोन्ही धातूंमध्ये घसरण दिसून आली. मात्र आठवड्याअखेर सोन्याच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे.

9 ऑगस्ट रोजी शुक्रवारी सोनं हजार रुपयांनी वाढले होते. तर, आजही 200 रुपयांनी वाढले आहे. स्थानिक ज्वेलर्सकडून होत असलेली मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील मजबूत कल यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.

आज सोन्यानं 70 हजारांचा आकडा गाठला आहे. 24 कॅरेट सोनं 220 रुपयांनी महागले आहे. त्यामुळं शनिवारी 70,310 रुपये इतका आजचा सोन्याचा भाव आहे. 22 कॅरेट सोनं 200 रुपयांनी वाढलं आहे. आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 64, 450 रुपये इतकी आहे.

सप्टेंबर महिन्यात फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करु शकते. तर, दुसरीकडे ईरान-इस्त्राइलमध्ये सुरू असलेल्या सततच्या संघर्षामुळं राजकारणातही चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. या दोन्ही परिस्थितीमुळं सोन्याची मागणी वाढू शकते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.