⁠ 
मंगळवार, सप्टेंबर 17, 2024
Home | जळगाव जिल्हा | लाडकी बहीण योजनेच्या खर्चाबाबत राज्य वित्त विभागाचा आक्षेप; मंत्री गुलाबराव पाटील म्हणतात..

लाडकी बहीण योजनेच्या खर्चाबाबत राज्य वित्त विभागाचा आक्षेप; मंत्री गुलाबराव पाटील म्हणतात..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२४ । राज्य सरकारने महिलासाठी लाडकी बहीण योजना सुरु केली असून मात्र, राज्याच्या वित्त विभागाने या योजनेच्या खर्चाबाबत आक्षेप घेतला असून यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमचे सरकार असल्यामुळे योजनेचा खर्च कसा करायचा याची काळजी वित्त विभागाने घेण्याची गरज नसल्याचे मंत्री पाटील म्हणाले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसापूर्वी राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री त अर्थ वित्तमंत्री अजित पवार यांनी सादर केला. यावेळी त्यांनी महायुतीची महत्वकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. मात्र राज्याच्या वित्त विभागाने या योजनेवर चिंता व्यक्त केली आहे. राज्यावर आधीच तब्बल 8 लाख कोटींचे कर्ज असताना ही योजना राबवायची कशी? असा प्रश्न वित्त विभागाकडून राज्य सरकारला विचारण्यात आला आहे. या योजनेवर वित्त विभागाने आक्षेप घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यावरून विरोधकांकडून देखील सरकारवर निशाणा साधला जात आहे.

अशातच यावर राज्याचे मंत्री गुलाबराव पाटीलांनी प्रक्रिया देत अर्थसंकल्प जेव्हा सादर होतो त्यावेळी योजने संदर्भातल्या खर्चाबाबत अर्थसंकल्पात तरतूद केलेली असते. त्यामुळे योजनेचा लाभ हा कसा द्यायचा हे सरकारला माहिती आहे असं म्हटलं आहे. तसेच केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी योगायोगाने आमचे सरकार असल्यामुळे योजना खर्च कसा करायचा याची काळजी वित्त विभागाने घेण्याची गरज नाही

पैसे कसे आणायचे हे त्याबाबत मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री हे सक्षम आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना सरकारने जी बोली केलेली आहे त्यानुसार 1500 रुपये पुढच्या महिन्यात आम्ही त्यांच्या खात्यावर टाकणार असल्याचं मंत्री पाटील म्हणाले. विरोधकांना आता कुठल्याही कामाला आलेला नाहीये निवडणुकीपुरता आता ते अशा पद्धतीने बोलत असून महिला आमच्याकडे जाऊ नये आहेत त्यासाठी ते अशा खोट्या बातम्या पसरवत आहेत..

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.