⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | बातम्या | ग्राहकांना सुवर्णसंधी! सोने 5000, तर चांदी 11 हजार रुपयांनी घसरली, जळगावात असे आहेत भाव?

ग्राहकांना सुवर्णसंधी! सोने 5000, तर चांदी 11 हजार रुपयांनी घसरली, जळगावात असे आहेत भाव?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२४ । सोने आणि चांदीच्या किमतीने या आठवड्यात ग्राहकांना मोठा दिलासा दिला. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले होते. मात्र कस्टम ड्युटी कमी करण्याच्या सरकारच्या घोषणेनंतर दोन्ही धातूंमध्ये भलीमोठी घसरण झाली.

जळगाव सुवर्ण बाजारात गेल्या आठ दिवसांत सोने पाच हजार, तर चांदी ११ हजार रुपयांनी घसरली आहे. यामुळे आगामी सणासुदीसह इतर कार्यक्रमासाठी दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना स्वस्तात सोने चांदी खरेदीची संधी आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील सीमा शुल्क १५ टक्क्यांवरून ६ टक्क्यापर्यंत कमी करण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर मंगळवारपासूनच भाव कमी होण्यास सुरुवात झाली. मंगळवारी सोने २८०० रुपयापर्यंत तर बुधवारी ७०० रुपयांनी घसरले व गुरुवारी पुन्हा ५०० रुपयांची घसरण झाली. शुक्रवारी ते याच भावावर स्थिर होते.त्यामुळे ते ६९ हजार ५०० रुपये प्रतितोळ्यावर आले.

मात्र, गेल्या आठवडाभरातील स्थिती पाहिली, तर १८ जुलै रोजी सोने ७४ हजार ५०० रुपयांवर होते. त्यानंतर तीन दिवस थोडीफार घसरण होत होती. मात्र, अर्थसंकल्प जाहीर झाल्यापासून अधिकच घसरण वाढली व आठ दिवसांत सोने ७४ हजार ५०० रुपयांवरून शुक्रवारी ६९ हजार ५०० रुपयांवर आले. दुसरीकडे चांदीचा दर देखील ११ हजार रुपयांनी घसरला आहे.

सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करण्याची योग्य वेळ?
तज्ज्ञांच्या मते, सोन्या-चांदीच्या दरात ज्या प्रकारे घसरण झाली आहे, ते पाहता ही घसरण आगामी काळातही कायम राहील, असे म्हणता येईल. जेव्हा किंमती घसरत असतात, तेव्हा लोक सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करू शकतात, कारण ते नेहमीच गुंतवणुकीसाठी सुरक्षित मानले गेले आहे. सोन्या-चांदीत गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे तज्ज्ञांच्या मत आहेत. जर तुम्ही सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ते थोडे थोडे खरेदी करू शकता.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.