जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२४ । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करताना आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्पात नोकरदारांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना सरकार पहिल्या महिन्याचा पगार देणार आहे,अशी घोषणा निर्मला सितारामन यांनी केली.
कर्मचारी आणि रोजगार निर्मिती करणाऱ्या दोघांनाही सरकार मदत करणार आहे. नवीन कर्मचाऱ्यांना १५००० रुपयांपर्यंत पगार सरकारकडून देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
सरकारच्या या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. यात नवीन कंपनीतील नवीन कर्मचाऱ्याला पहिल्या महिन्याचा पगार सरकार देणार आहे. याशिवाय रोजगाराच्या पहिल्या चार वर्षांमध्ये EPFO मध्येही योगदान देणार आहे. कर्मचाऱ्यांच्या पहिल्या पगारात १५००० रुपयांपर्यंत सरकार मदत करेन. हे पैसे तीन हप्त्यांमध्ये देण्यात येणार आहे. याचसोबत रोजगारासंबंधित तीन योजना सुरु करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.