⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | जळगाव जिल्हा | आनंदाची बातमी! सोन्याचे भाव आणखी घसरले, चांदीची चमकही पडली फिकी..

आनंदाची बातमी! सोन्याचे भाव आणखी घसरले, चांदीची चमकही पडली फिकी..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२४ । सोने-चांदीच्या दरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ उतार सुरु आहे. सोने तसेच चांदीचे दर भविष्यात वाढणार असल्याचं बोललं जात असून यामुळे जे व्यक्ती पुढल्या वर्षी लग्नाच्या तयारीत आहेत ते आताच सोने खरेदी करत आहेत. दरम्यान, तुम्हीही सोने किंवा चांदी खरेदीचा प्लॅन करत असाल तर जाणून घ्या आज काय आहेत भाव..

खरंतर केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होण्यासाठी आता केवळ एकच दिवस उरला असून अशातच आज म्हणजेच २२ जुलै २०२४ला चांदीत आणि सोन्यात किंचीत पडझड दिसून आली. मागील आठवड्यात सोन्याने मोठी घसरण नोंदवली त्यानंतर मात्र, सोन्याने जोरदार मुसंडी मारली. मागील आठवड्याच्या सुरुवातीला सोने ३८० आणि ९८० रुपयांनी महागले. १८ जुलैला १६० तर १९ जुलैला ४९० आणि शनिवारी ३८० रुपयांनी सोने स्वस्त होत आठवड्याच्या शेवटच्या दिवसी सोन्यात घसरण दिसली. गुडरिटर्न्सनुसार, आता २२ कॅरेट सोने ६७,७९० रुपये प्रति १० ग्रॅमनुसार तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७३,९६० रुपये प्रति १० ग्रॅमनुसार आहे.

चांदीची चमक फिकी
या महिन्यात चांदीची चमक बरीच चकाकली मात्र, मागील आठवड्यासह या आठवड्याची सुरुवातही चांदीत पडझड दिसली. आठवड्याच्या सुरुवातीलाच चांदीने घसरणीचे सत्र नोंदवले. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव ९१,४०० रुपये आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.