जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२४ । यावल शहरातील महर्षी व्यास मंदिरात उद्या रविवारी (दि.२१) श्री व्यास पौर्णिमेनिमित्त उत्सव आयोजित करण्यात आला आहे. गुरू पौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा साजरी होत असून या निमित्त येथे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे, या उत्सवासाठी तयारी सुरू आहे.
दरवर्षी आषाळशुध्द पौर्णिमेला यावल शहरातील श्री महर्षी व्यास मंदिर येथे यात्रोत्सव साजरा होतो. जिल्ह्यासह राज्यभरातून व शेजारील राज्यातून भाविक दर्शनासाठी येतात. श्री महर्षी व्यासांचे भारतात तीन मंदिर आहेल, त्यापैकी महाराष्ट्रात एकमेव यावलचे मंदिर आहे. व्यासांना सकळ विश्वाचे गुरू मानण्यात येते.
म्हणन भाविक गरू पौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा मानतात. रविवारी सकाळी ८ ते १० या वेळेत श्री महर्षी व्यासांची महापूजा होईल, त्यानंतर १० वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत भाविकांना महर्षीचे दर्शन घेता येणार आहे. सोबतच महाप्रसादाचाही कार्यक्रम होईल. भाविकांना दर्शनाच्या अडचणी येऊ नये म्हणून सुमारे १०० स्वयंसेवक व यावल पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.