जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२४ । सोने-चांदी खरेदी करणार असाल तर तुमच्याला झटका देणारी एक बातमी आहे. मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळाली. गेल्या दोन आठवड्यात दोन्ही धातूंच्या किमतीत वाढ पाहायला मिळाली. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी देखील सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ पाहायला मिळाली.
जळगावच्या सुवर्णपेठेत सोमवारी सोने २०० रुपये प्रति तोळ्याने महागले, तर चांदीच दर देखील हजार रुपयांनी महागली. चांदी शुक्रवारी ९३ हजार रुपये किलोवरून ९२ हजारांवर आली होती. सोमवारी त्यात हजार रुपयांची वाढ होऊन चांदी पुन्हा ९३ हजार रुपये किलोवर पोहोचली. शुक्रवारी ७३१०० रुपये तोळा असलेले सोने सोमवारी २०० रुपयांनी वाढून ७३३०० रुपये झाले.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढल्याने सोने चांदीचे दर महागले. आगामी दिवसात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सोन्या आणि चांदीच्या दराने विक्रमी उच्चांक गाठले.