जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२४ । मे महिन्यात ऐतिहासिक पातळीवर गेलेल्या सोने आणि चांदीच्या दराने जून महिन्यात दिलासा होता. मात्र जुलै महिन्यात दोन्ही धातूंमध्ये वाढ होताना दिसून आली. जळगाव येथील सुवर्णनगरीत गेल्या दोन दिवसांत सोने चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
एकीकडे लग्नसराईचे दिवस सुरु असताना यातच सोने चांदी महागल्याने ग्राहकांना झटका बसला आहे. जळगावात 10 जुलै रोजी चांदीचा दर हा 92 हजारांवर होता. आता आज चांदीचा दर 12 जुलै रोजी 94 हजारांवर पोहचला आहे. तर सोन्याचा दरही 10 जुलै रोजी 72,500 रुपये इतका होता. तर आज सोन्याचा भाव 73000 वर पोहोचला आहे.
दोन दिवसांत सोने आणी चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, दरातील ही चढ-उतार आठवडाभर राहण्याचा अंदाज आहे.दुसरीकडे इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने उतरले तर चांदीची भरारी दिसली. 24 कॅरेट सोने 72,563 रुपये,तर 22 कॅरेट सोने 66,468 रुपये झाले. सोबतच एक किलो चांदीचा भाव 92,204 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.