जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२१ । यावल तालुक्यात आज सायंकाळी विजांचा लखलखट आणि ढगांचा गडगडटासह झालेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून काही भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला.
गेल्या काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी पाऊस पडत आहे. आज रविवारी पहाटे जिल्ह्यात विविध भागात विजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. यावल तालुक्यात आज रविवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास अचानक सुसाट वारा वाहू लागला. काही वेळेतच विजांचा लखलखट आणि ढगांचा गडगडटासह पावसाचे आगमन झाले. मुसळधार पाऊस सुमारे १ तास सुरू होता. अचानक आलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. दरम्यान, या पावसामुळे पुन्हा हवेत गारवा निर्माण झाला.
तसेच काही भागात पावसामुळे वीज पुरवठा खंडीत झाला होता. काही भागांमध्ये झाडे देखील कोसळली. तर काही घरांमध्ये पाणी शिरले होते.