⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | वाणिज्य | सोने 400 तर चांदी 1000 रुपयांनी महागले ; आजचे जळगावातील भाव वाचा..

सोने 400 तर चांदी 1000 रुपयांनी महागले ; आजचे जळगावातील भाव वाचा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२४ । जून महिना ग्राहकांना पावला आहे. या महिन्यात सोने आणि चांदीला मोठा विक्रम करता आला नाही. हा महिना उद्या संपले. गेल्या काही दिवसापासून दोन्ही धातूंच्या किमतीत चढउतार सुरूच आहे. दरम्यान, जळगाव सुवर्णनगरीत शुक्रवारी सोन्यासह चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली.

२४ कॅरेट सोन्याचे दर शुक्रवारी ४०० रुपयांनी वाढून विनाजीएसटी ७२३०० रुपयांवर पोहोचले. दुसरीकडे चांदीचे दर गुरुवारच्या तुलनेत किलोमागे एक हजार रुपयांनी वाढून ८९००० रुपयांवर पोहोचले. दरम्यान, आगामी आठवडाभरात कमी-अधिक प्रमाणात सोने-चांदी दर वाढू शकतात.

गेल्या तीन आठवड्यापासून सोन्यात मोठी उसळी दिसली नाही.यापूर्वी मे महिन्यातच २४ कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी ७५००० रुपये प्रति १० ग्रॅमच्या पुढे गेला होता. मात्र उच्चांकीपासून सोन्याच्या दरात जवळपास ३००० रुपयापर्यंतची घसरण झाली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.