⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | ..तर भर रस्त्यात गोळी घालेल; आ. मंगेश चव्हाणांना धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ

..तर भर रस्त्यात गोळी घालेल; आ. मंगेश चव्हाणांना धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२४ । चाळीसगाव भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांना भर रस्त्यावर पिस्तूलने गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे महायुतीचे कार्यकर्ते प्रचंड संतापले असून त्यांनी गुंडागिरीची भाषा करणाऱ्या नेत्याला अटक करण्याची मागणी गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे कळते.

महाविकास आघाडीच्या वतीने चाळीसगाव येथे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनाच्या ठिकाणचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यात टाकळी प्रचा गावाचे माजी सरपंच व महाविकास आघाडीचे नेते किसन जोर्वेकर याने आपल्या भाषणात आमदार मंगेश चव्हाण पिस्तूलाने गोळी घालून मारून टाकण्याची भाषा केली.

नेमकं काय म्हणाले किसन जार्वेकर?
मंगेश चव्हाण यांना चॅलेंज आहे त्यांनी या मतदारसंघातून निवडून येऊन दाखवावं. छत्रपतींची शपथ घेऊन सांगतो मी त्यांना संपवून टाकेल. माझं वय 73 वर्षे आहे. मला कॅन्सर आणि डायबिटीस आहे. माझ्या नादी लागशील तर रस्त्यावर पिस्तुल्याने गोळी घालून टाकेल. भर सभेत उपस्थितांना संबोधीत करताना जार्वेकरांनी अशी धमकी दिली आहे. धमकीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून जार्वेकर यांनी हे वक्तव्य केलं तेव्हा त्यावेळी तेथे माजी खासदार उन्मेष पाटील आणि माजी आमदार राजीव देशमुख हे देखील उपस्थित होते.

शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी दुष्काळी अनुदानासाठी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनावरून उन्मेष पाटील आणि मंगेश चव्हाण यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. सरकारी पेन्शन घेणाऱ्या आणि हजारो रुपयांचे दुष्काळी अनुदान मिळवणाऱ्या पाटील यांचे हे आंदोलन स्वतःसाठी आहे. गरीब शेतकऱ्यांविषयी त्यांना काहीही कळवळा नाही अशा शब्दांत उन्मेष पाटील यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यावरून किसनराव जोर्वेकर यांनी ही धमकी दिल्याचं म्हटलं जातंय.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.