⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहरात एमडी ड्रग्ज वितरण करणारे रॅकेट पुन्हा सक्रिय

जळगाव शहरात एमडी ड्रग्ज वितरण करणारे रॅकेट पुन्हा सक्रिय

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२४ । पोलिसांनी तीन महिन्यांपूर्वी शहरातील शाहूनगरात १० लाख रुपये किमतीचा १२२ ग्रॅम एमडी ड्रग्ज (अमली पदार्थ) पावडरचा साठा जप्त केला आहे. यात विक्रेता व कथित पुरवठादार अशा दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी गेल्या आठवडधात चार्जशिट दाखल झाले आहे. मात्र, तिसऱ्या संशयितापर्यंत पोलिस अद्याप पोहोचलेले नाहीत. त्याचा परिणाम शहरात एमडी ड्रग्ज वितरण करणारे रॅकेट कार्यरत झाले आहे.

शाहूनगरातील पडक्या शाळेच्या परिसरात एमडी ड्रग्ज या अमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या माहितीवरून तीन रात्र जागून शहर पोलिसांच्या डीबी टीमने २२ मार्च रोजी इम्रान उर्फ इम्मा हसन भिस्ती (रा. पत्री मशिदीजवळ, शाहूनगर) व त्याच्या सांगण्यावरून कथित पुरवठादार गोकुळ उर्फ रघू विश्वनाथ उमप (वय ४०, रा. कंजरवाडा) यालाही अटक करण्यात आली. त्यांची पोलिस कोठडी संपल्यानंतर ते कारागृहात आहेत. गुन्हा घडल्यापासून नियमानुसार ९० दिवसांत दोघांविरुद्ध गेल्या आठवड्यात न्यायालयात चार्जशिट दाखल केले असल्याचे तपासी अधिकारी यांनी सांगितले

तिसऱ्या संशयिताचा शोध
एमडी ड्रग्जचा साठा आढळल्याने शहरात मोठ्या प्रमाणाकर ग्राहक असणे स्वाभाविक आहे. तसेच या प्रकरणात भिस्तीचा आणखी साथीदार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, मात्र अद्यापही पोलिस त्याला पकडू शकलेले नाहीत. त्यामुळे एमडी ड्रग्ज पावडर वितरणाची साखळी तात्पुरती खंडित झालेली असली प्रकरण शांत झाल्यानंतर शहरात पुन्हा एमडी ड्रग्ज वितरणाची व्यवस्था कार्यरत झाल्याची माहिती समोर आली आहे. पुरवठादारांनी शहरापासून लांब असलेल्या दोन्ही टोकाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या परिसरात बाहेरगावावरून आलेल्या विद्याथ्यांसाठी वितरणाची व्यवस्था छुप्या पद्धतीने सुरू केली आहे

संशयित भिस्ती याला पाठबळ देणाऱ्यापर्यंत पोलिस पोहोचेना
काही महिन्यांपूर्वी गुटखा विक्री करणारा इझमान तर्फ इम्मा हसन भिस्ती याच्यात १० लाखांची गुंतवणूक करू शकण्याची क्षमता नाही. त्यामुळे त्याच्या मागे निश्चित कोणत्या तरी बड्या व्यक्तीचा हात असण्याची शक्यता वर्तवली जात होती. भिस्तीच्या या गॉडफादरपर्यंतही पोलिस अद्याप पोहोचू शकलेले नाहीत. या अवैध धंद्याला पाठबळ देणारी ती व्यक्ती नेमकी कोण आहे? याचा शोध पोलिसांकडून घेतला जातो आहे. मात्र, याबाबत त्यांना अपेक्षित असे धागेदोरे गवसलेले नाहीत. दुसरीकडे ड्रग्ज विक्रीचे रकेट पुन्हा सक्रिय झाल्याची माहिती पुढे येत असल्याने तिसऱ्या संशयिताच्या मुसक्या आवळणे मोठे आव्हान आहे

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.