जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२४ । आज १० व्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने जळगाव शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे आयोजित कार्यक्रमास खासदार स्मिताताई वाघ, आ.राजूमामा भोळे, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी ताई पाटील, प्रदेश सचिव रेखा वर्मा यांनी उपस्थित राहून पॉवर योगा परिवार आणि हास्य परिवार ग्रुप येथे भेट देऊन संवाद साधला.
यावेळी पॉवर योगा परिवाराचे अध्यक्ष ऍड भास्कर पोपळे, नंदकिशोर पाटील, सुनील सोनवणे, नंदलाल तिडके, संजय मराठे, हास्य परिवार ग्रुपचे संचालक अश्विन गांधी, हरेश सर, अजय जाधव आणि महिला पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.